lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ एकाच दिवशी ४ कंपन्यांचे IPO सादर होणार; पाहा, डिटेल्स

गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ एकाच दिवशी ४ कंपन्यांचे IPO सादर होणार; पाहा, डिटेल्स

IPO: ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी ४ कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात सादर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 03:58 PM2021-07-31T15:58:42+5:302021-07-31T15:59:26+5:30

IPO: ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी ४ कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात सादर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

exxaro tiles devyani windlass bio and krishna ipo to open in share market in one day | गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ एकाच दिवशी ४ कंपन्यांचे IPO सादर होणार; पाहा, डिटेल्स

गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ एकाच दिवशी ४ कंपन्यांचे IPO सादर होणार; पाहा, डिटेल्स

मुंबई: कोरोना संकटाच्या कालावधीत अर्थचक्र मंदावल्याचे दिसत असले, तरी शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड यशस्वीरित्या सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. चालु आर्थिक वर्षात अनेकविध क्षेत्रातील कंपन्यांचे IPO शेअर बाजारात सादर झाले. अनेक कंपन्यांच्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना अगदी मालामाल केले. यातच आता ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी ४ कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात सादर होणार असल्याचे सांगितले जात आहे. (exxaro tiles devyani windlass bio and krishna ipo to open in share market in one day)

४ ऑगस्ट हा दिवस गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी घेऊन येणारा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण या एकाच दिवशी ४ विविध क्षेत्रातील कंपन्यांचे आयपीओ बाजारात सादर केले जाणार आहेत. यामध्ये देवयानी इंटरनॅशनल, विंडलास बायो, कृष्णा डायग्नोस्टिक आणि एक्झारो टाइल्स यांचा समावेश आहे. यापैकी देवयानी इंटरनॅशनल ही सर्व्हिस क्षेत्रातील कंपनी असून, केएफसी, पिझ्झा हट यांसारख्या ब्रँड यांकडे फ्रेंचायझी आहे. देवयानी इंटरनॅशनलाच्या शेअर ऑफरसाठी ८६ ते ९० दरम्यान किंमत निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये किमान १६५ शेअरसाठी बोली लावता येणार आहे.

“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”

एक्झारो टाइल्स लिमिटेड

व्हिर्ट्रिफाइड टाइल्सच्या क्षेत्रातील एक आघाडीचे उत्पादक असलेल्या गुजरातमधील एक्झारो टाइल्स लिमिटेडने भांडवल उभारणीची घोषणा केली आहे. कंपनीची समभाग विक्री बुधवार ४ ऑगस्ट २०२१ रोजी खुली होणार असून शुक्रवारी ०६ ऑगस्ट २०२१ रोजी बंद होईल. या ऑफरसाठी ११८ ते १२० दरम्यान किंमत निश्चित करण्यात आली आहे. कंपनी समभाग विक्रीतून १६१ कोटी उभारणार आहे. किमान १२५ शेअरसाठी बोली लावता येणार आहे.

कृष्णा डायग्नोस्टिक आणि विंडलास बायो

कृष्णा डायग्नोस्टिकचा आयपीओ ४ ऑगस्ट रोजी येणार असून, या माध्यमातून कंपनीने १ हजार २१३ कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले असून, यापैकी ४०० कोटी रुपयांचे नवे इश्यू असतील. बाकी ऑफर फॉर सेल असेल. तसेच याच्या शेअरची किंमत ९३३ ते ९५४ रुपये या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, विंडलास बायो कंपनीचा आयपीओही याच दिवशी येणार असून, या माध्यमातून कंपनीने ४०१ कोटी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या कंपनीने शेअरची किंमत ४४८ ते ४६० रुपयांदरम्यान निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. 

आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

दरम्यान, कारट्रेड या कंपनीचाही आयपीओ शेअर बाजारात येणार असून, तो ४ किंवा ६ ऑगस्ट रोजी सादर करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. या माध्यमातून कारट्रेड २ हजार कोटी रुपये उभारणार आहे. याशिवाय नोवोको कंपनीकडून ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीओ सादर करण्याची तयारी केली जात असून, यातून ५ हजार कोटी रुपये उभारले जाणार आहेत. ही निरमा ग्रुप सिमेंटची कंपनी आहे.  
 

Web Title: exxaro tiles devyani windlass bio and krishna ipo to open in share market in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.