lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > डेटा संपलाय?, असं घ्या फटाफट 2GB इंटरनेट; पाहा काय आहे Reliance Jio ची ही विशेष ऑफर

डेटा संपलाय?, असं घ्या फटाफट 2GB इंटरनेट; पाहा काय आहे Reliance Jio ची ही विशेष ऑफर

रिलायन्स जिओ आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर घेऊन आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 08:30 PM2022-03-27T20:30:41+5:302022-03-27T20:30:59+5:30

रिलायन्स जिओ आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर घेऊन आली आहे.

Data out ?, Take 2GB internet fast; See what is this special offer of Reliance Jio | डेटा संपलाय?, असं घ्या फटाफट 2GB इंटरनेट; पाहा काय आहे Reliance Jio ची ही विशेष ऑफर

डेटा संपलाय?, असं घ्या फटाफट 2GB इंटरनेट; पाहा काय आहे Reliance Jio ची ही विशेष ऑफर

सध्या देशातील सर्वच दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांना टिकवण्यासाठी आणि नव्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी निरनिराळे प्लॅन्स आणि ऑफर्स आणत आहे. Reliance Jio देखील याला अपवाद नाही. सुरूवातीपासूनच जिओ अन्य कंपन्यांना मोठी टक्कर देत आहे. आताही कंपनीनं ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे. 

रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या यूजर्ससाठी खास सेवा दिली आहे. याच्या माध्यमातून तुमचे इंटरनेट संपल्यावर तुम्ही सहजपणे डेटा लोन घेऊ शकता. तुम्ही त्याची परतफेड देखील सहजरित्या करू शकता. जाणून घेऊया नक्की सेवा आहे काय. जर तुम्ही रिलायन्स जिओचे प्रीपेड युझर असाल आणि वापरादरम्यान अचानक तुमचा डेटा संपल्यास तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे  जर तुम्हाला इंटरनेटची गरज असेल, तर तुम्ही Jio इमर्जन्सी डेटा व्हाउचर वापरू शकता.

कसा मिळवाल डेटा ?

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माय जिओ अॅप ओपन करावं लागेल. 
  • मेन्यूमध्ये जा आणि त्या ठिकाणी मोबाईल सर्व्हिसेस ऑप्शनवर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्हाला इमर्जन्सी डेटा व्हाऊचर दिसेल.
  • त्याला सिलेक्ट करून गेट इमर्जन्सी डेटा वर क्लिक करा.
  • यानंतर नाऊ अॅक्टिव्हेटवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला जिओकडून 2GB डेटा लोन म्हणून मिळेल.


काय आहेत नियम?

  • 2GB डेटासाठी तुम्हाला २५ रुपये द्यावे लागणार आहेत.
  • यासाठी सर्वप्रथम तुमच्या माय जिओ अॅपमध्ये जा.
  • इमर्जन्सी डेटा व्हाउचरवर क्लिक करा.
  • त्यानंतर प्रोसीडवर जाऊन 'पे' या ऑप्शनवर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्ही वापरलेल्या डेटाचे पैसे भरू शकता.

Web Title: Data out ?, Take 2GB internet fast; See what is this special offer of Reliance Jio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.