lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इतका स्पीड तर बेझोस, मस्क, अंबानींचाही नाहीए! 'हा' भारतीय उद्योगपती सुस्साट; दिग्गजांची पिछेहाट

इतका स्पीड तर बेझोस, मस्क, अंबानींचाही नाहीए! 'हा' भारतीय उद्योगपती सुस्साट; दिग्गजांची पिछेहाट

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 07:24 PM2021-03-12T19:24:37+5:302021-03-12T19:32:10+5:30

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे

Billionaire Gautam Adani Beats Ambani, Musk, Bezos To Emerge on Top In Wealth Surge | इतका स्पीड तर बेझोस, मस्क, अंबानींचाही नाहीए! 'हा' भारतीय उद्योगपती सुस्साट; दिग्गजांची पिछेहाट

इतका स्पीड तर बेझोस, मस्क, अंबानींचाही नाहीए! 'हा' भारतीय उद्योगपती सुस्साट; दिग्गजांची पिछेहाट

गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती वेगानं वाढत आहे. अदानी यांच्या संपत्ती वाढीचा वेग जेफ बेझोस आणि एलन मस्कपेक्षा अधिक आहे. या वर्षात अदानी यांची संपत्ती सर्वाधिक वेगानं वाढत आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार या वर्षी गौतम अदानी यांची सपत्ती १६२० कोटी रुपयांनी वाढली आहे. अदानी यांची नेटवर्थ आता ५ हजार कोटी डॉलरच्या पुढे गेली आहे.

IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? 'या' ५ अतिशय महत्त्वाच्या गोष्टी; आवर्जुन लक्ष द्या

अदानी पॉवरपासून अदानी पोर्ट्सपर्यंत, अदानी समूहाच्या जवळपास सगळ्याच कंपन्या सध्या फायद्यात आहेत. त्यामुळे अदानी समूहाबद्दल गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाचं वातावरण आहे. केवळ एका कंपनीचा अपवाद वगळता अदानी सूमहातल्या सर्वच कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यात चालू वर्षात घसघशीत वाढ झाली आहे. या सगळ्याचा मोठा फायदा गौतम अदानी यांना झाला आहे.

Facebook युजर्ससाठी मोठी बातमी! आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवू शकता पैसे; जाणून घ्या, काय करावं लागेल?

मुकेश अंबानींनादेखील टाकलं मागे
गौतम अदानी यांनी संपत्ती वाढीच्या शर्यतीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनादेखील मागे टाकलं आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्या मुकेश अंबानींच्या संपत्तीत चालू वर्षात ८१० कोटी रुपयांनी वाढली आहे. मात्र एकूण संपत्तीचा विचार केल्यास अदानी अंबानी यांच्यापेक्षा बरेच मागे आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार अंबानी यांची नेटवर्थ (निव्वळ कमाई) ८,४८० कोटी डॉलर इतकी आहे. तर अदानी यांच्या संपत्तीचं मूल्य ५ हजार कोटी डॉलर आहे.

उद्योगाचा वेगानं विस्तार
न्याका ऍडव्हायजरी सर्व्हिसेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चंदिरमानी यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, अदानी अतिशय वेगानं त्यांच्या उद्योगाचा विस्तार करत आहेत. बंदरं, विमानतळं, कोळसा खाणी या क्षेत्रांमध्ये अदानी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. आता ते डेटा सेंटर उद्योगातही उतरत आहेत. अदानी एंटरप्रायझेसनं गेल्याच महिन्यात भारतात १ गिगाव्हॅट क्षमतेचं डेटा सेंटर उभारण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.

Web Title: Billionaire Gautam Adani Beats Ambani, Musk, Bezos To Emerge on Top In Wealth Surge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.