lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सारखं रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही; १२५ रूपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील वर्षभर चालणारे प्लॅन्स

सारखं रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही; १२५ रूपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील वर्षभर चालणारे प्लॅन्स

Prepaid Mobile Plans : दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याठी आणत आहेत नवे प्लॅन्स.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 03:15 PM2021-05-09T15:15:09+5:302021-05-09T15:16:14+5:30

Prepaid Mobile Plans : दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याठी आणत आहेत नवे प्लॅन्स.

best cheapest yearly prepaid plans of jio airtel vodafone idea just have to spend 125 rupees monthly | सारखं रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही; १२५ रूपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील वर्षभर चालणारे प्लॅन्स

सारखं रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही; १२५ रूपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील वर्षभर चालणारे प्लॅन्स

Highlightsदूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याठी आणत आहेत नवे प्लॅन्स.एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, जिओ यांसारख्या कंपन्यांकडून ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स

सध्या देशात सुरू असलेल्या दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याठी कंपन्या काही ना काही नवे प्लॅन्स आणतआहेत. अनेकदा ग्राहकांना दर महिन्याला किंवा तीन महिन्यांनी रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो. जर तुम्हाला यापासून वाचायचं असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या कंपन्या अगदी कमी किंमतीत १ वर्षाचे प्लॅन्स घेऊन आल्या आहेत. या प्लॅन्सचा महिन्याला खर्च १२५ रूपयांपेक्षाही कमी आहे. जाणून घेऊया या प्लॅन्समध्ये नक्की आहे काय आणि कोणती मिळतात बेनिफिट्स.

रिलायन्स जिओ 

रिलायन्स जिओकडे १२९९ रुपयांचा एक उत्तम प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना ३३६ दिवस म्हणजेच ११ महिन्यांची वैधता देण्यात येते. या प्लॅनची किंमत ११८ रूपये इतकी आहे. यात ग्राहकांना २४ जीबी डेटा देण्यात येतो. डेटा लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना ६४ केबीपीएस स्पीडनं डेटा मइळतो. याशिवाय या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंग, ३६०० एसएमएस आणि त्यासोबत JioTV, JioCinema, JioSaavn यासारख्या अॅपची सुविधाही देण्यात येते. 

एअरटेल

एअरटेल १४८ रूपयांत ३६५ दिवसांचा एक प्लॅन देत आहे. या प्लॅनच्या सहाय्यानं रिचार्ज केल्यास दर महिन्याला १२४.८ रूपयांचा खर्च तुम्हाला येईल. यामध्ये ग्राहकांना २४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळते. याशिवाय कंपनी या प्लॅनसोबत ३६०० एसएमएसही देते. याोबत ग्राहकांना एअरटेल एक्स्ट्रिम अॅप प्रिमिअम, हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचं सबस्क्रिप्शनही मिळतं. 

व्होडाफोन आयडिया

Vodafone-Idea या कंपनीकडे स्वस्त एका वर्षाचा प्लॅन उपलब्ध आहे. कंपनी १४९९ रूपयांमध्ये ३६५ दिवसांची वैधता देते. याचाच अर्थ एका महिन्याचा खर्च जवळपास १२४.९१ रूपये इतका आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, ३६०० एसएमएस आणि २४ जीबी डेटा मिळतो. 
 

Web Title: best cheapest yearly prepaid plans of jio airtel vodafone idea just have to spend 125 rupees monthly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.