lokmat Supervote 2024
Lokmat Money >बँकिंग > २ हजारांच्या नाहीत नाेटा, बॅंकेत कशाला जाऊ?

२ हजारांच्या नाहीत नाेटा, बॅंकेत कशाला जाऊ?

गुलाबी नाेट बदलण्यास तुरळक गर्दी; काही ठिकाणी फाॅर्म भरण्याच्या सक्तीमुळे नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 08:48 AM2023-05-24T08:48:54+5:302023-05-24T08:49:09+5:30

गुलाबी नाेट बदलण्यास तुरळक गर्दी; काही ठिकाणी फाॅर्म भरण्याच्या सक्तीमुळे नाराजी

Why go to the bank without a 2000 account? | २ हजारांच्या नाहीत नाेटा, बॅंकेत कशाला जाऊ?

२ हजारांच्या नाहीत नाेटा, बॅंकेत कशाला जाऊ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दाेन हजार रुपयांची नाेट बदलून घेण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी काही ठिकाणी आरबीआयच्या निर्देशानंतरही अनेक बँकांकडून ओळखपत्राची मागणी करण्यात आल्याची तक्रार ग्राहकांनी केली. मात्र, नाेटा बदलण्यासाठी कुठेही माेठ्या रांगा लागल्या नाहीत. देशभरात बहुतांश ठिकाणी बँकांमधील कामकाज सुरळीत सुरू हाेते.

अनेक बँकांनी आरबीआयच्या निर्देशांनंतरही लाेकांना ओळखपत्र मागितले, तसेच फाॅर्म भरून देण्यास सांगितले. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र पहिल्या दिवशी काेठेही गर्दी किंवा रांगा दिसून आल्या नाहीत.

सुटलाे एकदाचे ! नाेट एकदाची दिली बाबा परत
२ हजार रुपयांच्या परत करण्यासाठी मुंबईत बॅंकांमध्ये तुरळक गर्दी हाेती. एकदाची ही नाेट बदलून ५०० रुपयांच्या नाेटा मिळाल्यानंतर एका ग्राहकाचा चेहरा असा खुलला. तर नवी दिल्ली येथील एका बॅंकेत गेलेल्या तरूणीने जवळच्या २ हजारांच्या नाेटा दाखविल्या. 

दाेन हजारांची नाेट ठेवणार कुठे?
सामान्य लोकांकडे या नोटा नसल्यामुळे बँकांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले नाही. एवढ्या दोन हजारांची नोट आता कुठे ठेवणार ? पैसेच नाहीत. श्रीमंत लोकांकडेच या नोटा सापडतील ! अशा प्रतिक्रिया बँकांमधील ग्राहकांकडून आल्या.

न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही : आरबीआय 
२ हजार रुपयांच्या नाेटा परत घेणे म्हणजे नाेटाबंदी नसून एक कायदेशीर प्रक्रिया आहे. अशा प्रकरणांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. इतर चलनी नाेटा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, असे उत्तर आरबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात दिले. 

काेणत्याही ओळखपत्राविना नाेटा बदलण्याच्या निर्णयाविराेधात अश्विनी उपाध्याय यांनी याचिका दाखल केली हाेती. त्यावर न्यायालयाने निर्णय सुरक्षित ठेवला.

Web Title: Why go to the bank without a 2000 account?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.