सोनम कपूर आणि फॅशन जगत हे काही वेगळे नाहीत. सोनम कपूरला बॉलिवूडची फॅशनिस्ट म्हणतात ते काही उगीच नाही. तिच्या फॅशन स्टाईल्स आणि फॅशन क लेक्शनवर चाहते अगदी फिदा असतात. आता हेच बघा ना, अलीकडेच ती ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या प्रमोशनला ती अशा काही ड्रेसिंग स्टाईलमध्ये आली की, सर्वत्र त्याची चर्चा झाली. एवढेच नाही तर तिने कॅरी केलेलल्या बॅगची किंमत ऐकून तर तुम्ही चक्रावूनच जाल.      

            

अभिनेत्री सोनम कपूरने एखादी फॅशन के ली आणि त्याचा बोलबाला झाला नाही, असे होतच नाही. अलीकडेच ती  ‘द झोया फॅक्टर’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. तेव्हा तिने लाल रंगाचा अत्यंत क्यूट ड्रेस घातला होता. त्यानंतर अजून एका ऑफिशियल  प्रमोशनसाठी ती आली असता  तेव्हाही तिने लाल रंगाचाच ड्रेस घातला होता. तिला या इव्हेंटमध्ये पत्रकारांनी विचारले असता ती म्हणाली,‘मी मुद्दामुनच माझ्या झोयाच्या कॅरेक्टरला लोकांसमोर ठेवण्यासाठी अशा कॉस्च्युममध्ये आले आहे.’ तसेच यावेळी अजून एक गोष्ट चर्चेत होती. ती म्हणजे तिने कॅरी केलेली बॅग. तिच्या या बॅगची किंमत जवळपास १ लाख ४३ हजार चारशे पंचेचाळीस रूपये किंमतीची होती. तुम्हीही या बॅगच्या प्रेमात पडाल अशीच काहीशी ती आहे.

दिग्दर्शक झोया अख्तर हिचा आगामी चित्रपट ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात सोनम कपूर झोया सोलंकी या अ‍ॅडर्व्हटायजिंग एक्झिक्युटिव्हची भूमिका साकारणार आहे. ती भारतीय क्रिकेट टीमसाठी लकी ठरलेली असते. ती या चित्रपटात दलकीर सलमान, अंगद बेदी यांच्यासोबत दिसणार असून हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.               

Web Title:  You will be shocked to hear about the price of Sonam Kapoor's 'This' bag!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.