'वॉर'ची वर्षपूर्ती; चित्रपटात एक नाही तर होते दोन अ‍ॅक्शन सुपरस्टार्स - सिद्धार्थ आनंद

By तेजल गावडे | Published: October 2, 2020 03:49 PM2020-10-02T15:49:36+5:302020-10-02T15:50:22+5:30

'वॉर' चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले असून २०१९ मध्ये सर्वाधीक कमाई करणारा चित्रपट ठरला.

Year of the War; There were not one but two action superstars in the film - Siddharth Anand | 'वॉर'ची वर्षपूर्ती; चित्रपटात एक नाही तर होते दोन अ‍ॅक्शन सुपरस्टार्स - सिद्धार्थ आनंद

'वॉर'ची वर्षपूर्ती; चित्रपटात एक नाही तर होते दोन अ‍ॅक्शन सुपरस्टार्स - सिद्धार्थ आनंद

googlenewsNext

'वॉर' हा आतापर्यंतचा ऐतिहासिक ब्‍लॉकबस्‍टर चित्रपट आहे. या चित्रपटाने वर्ष २०१९ मध्‍ये बॉक्‍स ऑफिसवर विक्रमांचा पाऊस पाडला आणि वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. सिद्धार्थ आनंद यांचे दिग्‍दर्शन असलेल्‍या या चित्रपटामध्‍ये देशातील दोन सर्वात मोठे अ‍ॅक्शन सुपरस्‍टार्स - हृतिक रोशनटायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होते. त्‍यांच्‍यामधील जुगलबंदीने प्रेक्षकांना भरपूर मंत्रमुग्‍ध केले. भारतामध्‍ये जवळपास ३२० कोटी रूपयांची निव्‍वळ कमाई केलेल्‍या या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने सिद्धार्थ आनंद म्‍हणाले की, आदित्‍य चोप्रा व त्‍यांना 'वॉर'सह भारतातील अ‍ॅक्शन दर्जाला नवीन रूप देण्‍यासाठी नवीन बेंचमार्क स्‍थापित करावे लागले.

सिद्धार्थ आनंद पुढे म्‍हणाले, ''आम्‍ही सुरूवात केली तेव्‍हा मी 'वॉर'ची पटकथा लिहिताना इंग्रजी चित्रपटाप्रमाणे लिहित होतो. त्‍यामध्‍ये गाणी नव्‍हती आणि त्‍याची भाषाशैली देखील अत्‍यंत नवीन होती. मी भाषाशैलीबद्दल बोलतोय, पण ही बोलीभाषा नाही, तर ही शैली चित्रपटाची भाषा आणि सीन्‍स कशाप्रकारे सादर करण्‍यात येतील याबाबत आहे. पटकथेनुसार प्रत्‍येक सीनचा कॉन्‍टेन्‍ट अत्‍यंत गुंतागुंतीचा होता आणि ज्‍याप्रमाणे गोष्‍टी पुढे सरकत होत्‍या की निरंतर थ्रिलर सुरू असल्‍यासारखे वाटले. मला चित्रपट प्रदर्शित झाल्‍यानंतर २ वर्षांमध्‍ये प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल याबाबत माहित नव्‍हते. हा चित्रपट सध्‍याच्‍या ट्रेण्‍ड्स आणि प्रेक्षकांची सर्वसमावेशक आवडीनुसार असेल की नाही, याबाबत देखील माहित नव्‍हते.'' 


ते पुढे म्‍हणाले, ''चित्रपट प्रदर्शित झाला तेव्‍हा सुदैवाने चित्रपट अत्‍यंत संबंधित व समकालीन होता आणि आमचा हाच प्रयत्‍न होता. चित्रपटासाठी कास्टिंग करण्‍यात आल्‍या तेव्‍हा मनात प्रथम हृतिक व टायगर यांची निवड करण्‍याचा विचार आला. हे कास्टिंग पहिल्‍यापासूनच निर्धारित होते, पण आम्हाला दोन्‍ही सुपरस्‍टार्स एकत्र येतील असे वाटले नव्‍हते. आज चित्रपटासाठी अभिनेत्‍याची निवड करणे अवघड बनले आहे आणि दोन सुपरस्‍टार्स मिळणे हे स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे होते. म्‍हणून चित्रपटाकडून अपेक्षा देखील उच्‍च होत्‍या.'' 


सिद्धार्थ यांनी त्‍यांच्‍या चित्रपटांच्‍या माध्‍यमातून नेहमीच प्रेक्षकांना नवनवीन मनोरंजन दिले आहेत. 'सलाम नमस्‍ते', 'ता रा रम पम', 'बँग बँग!' आणि आता 'वॉर' अशा सुपरहिट चित्रपटांसह दिग्‍दर्शकाने दाखवून दिले आहे की, ते अत्‍यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट-निर्माते आहेत, ज्‍यांची पडद्यावर नवनवीन मनोरंजन सादर करण्‍याची इच्‍छा आहे. 
ते म्‍हणाले, ''आमच्‍या चित्रपटामध्‍ये दोन सुपरस्‍टार्स होते, ज्‍यामुळे आम्‍हाला नवीन बेंचमार्क स्‍थापित करावा लागला. मी २०१२ मध्‍ये अ‍ॅक्शन चित्रपट करण्‍यास सुरूवात केली तेव्‍हा मला फक्‍त एवढेच माहित होते की, भारतामध्‍ये मला कोणताच बेंचमार्क किंवा टेम्‍पलेट नाही. कारण मला वाटत नाही की आपण भारतामध्‍ये अनेक अ‍ॅक्शन चित्रपट किंवा चांगले अ‍ॅक्शन चित्रपट बनवले आहेत. माझ्या पूर्वीच्‍या अ‍ॅक्शन चित्रपटांमध्‍ये संपादित केलेल्‍या यशांनुसार माझ्या स्‍वत:च्‍या अपेक्षांवरच मात करण्‍याची माझी इच्‍छा होती. माझी स्‍पर्धा 'बँग बँग!' चित्रपटामधील अ‍ॅक्शनबाबत होती. आम्‍ही 'बँग बँग!' चित्रपटामध्‍ये केलेले अ‍ॅक्शन सीक्‍वेन्‍स अत्‍यंत नवीन व सर्वोत्तम होते. मी त्‍यासोबतच स्‍पर्धा करत होतो आणि माझी प्रेक्षकांना अधिक रोमांचपूर्ण अनुभव देण्‍याची इच्‍छा होती. अखेर मी 'वॉर' चित्रपटामधून त्‍यांना अधिक रोमांचपूर्ण अ‍ॅक्शन चित्रपटाचा आनंद देण्यामध्‍ये यशस्‍वी ठरलो.''


'वॉर' चित्रपटासाठी तयारी करताना वायआरएफचे प्रमुख होंचो आदित्‍य चोप्रासोबत केलेल्‍या सर्जनशील चर्चांबाबत सांगताना सिद्धार्थ म्‍हणाले, ''मोठ्या अ‍ॅक्शन चित्रपटाची निर्मिती करण्‍यामधील सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्‍हणजे निर्माता. आणि आमच्याकडे आदि होता, जो एक सर्वोत्तम निर्माता आहे. तो खर्चाचा विचार करत नाही, पण पैशाचा योग्‍यरित्‍या वापर व योग्‍यरित्‍या खर्च होण्‍याची खात्री घेतो. आणि घेतलेली मेहनत पडद्यावर दिसून येते. माझ्यासोबत प्रेक्षकांना पडद्यावर कधीच न दिसण्‍यात आलेल्‍या अनुभवासोबत त्‍यापलीकडे जात अद्वितीय अनुभव देणारे चित्रपट निर्मिती करणारी व्‍यक्‍ती होती.''


ते पुढे म्‍हणाले, ''माझ्या मते, तो उत्तम निर्माता आहे, जो मला आ‍र्क्टीकमध्‍ये कारचा पाठलाग करण्‍याचा सीक्‍वेन्‍स शू‍ट करण्‍यासारखे विलक्षण सल्‍ले देऊ शकतो. ऋतिक व टायगर कलाकार असताना कोणताच निर्माता अशाप्रकारचे सल्‍ले देऊ शकला नसता, फक्‍त अ‍ॅक्शन सीक्‍वेन्‍स करू या, सेटमध्‍येच काही उच्‍चवर्धक अ‍ॅक्शन सीन्‍स करू या, इच्‍छा असल्‍यास सेट प्रज्‍वलित करू या असा सल्‍ला दिला असता. मी ते देखील केले आणि आ‍र्क्टीकवर कारचा पाठलाग करणारा सीक्‍वेन्‍स देखील केला. मी या गोष्‍टींबाबत सल्‍ले देऊ शकतो, कारण मला माहित आहे की आदिच्‍या रूपात तितकाच विलक्षण निर्माता सोबतीला आहे, ज्‍याला फक्‍त चित्रपट व सिनेमांसह जगावेसे वाटते. त्‍याच्‍यापेक्षा कोणी उत्तम निर्माता असेल का!''  

Web Title: Year of the War; There were not one but two action superstars in the film - Siddharth Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.