Will Ajay Devgn play the role of Ram or Ravana in Prabhas' Adipurush? Know the truth behind this | प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये अजय देवगण निभावणार राम की रावणची भूमिका? जाणून घ्या याबद्दल

प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये अजय देवगण निभावणार राम की रावणची भूमिका? जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आदिपुरूष चित्रपटात काम करताना दिसणार असल्याचे वृत्त मागील काही दिवसांपूर्वी समोर आले होते. तसेच तो रामाची भूमिका साकारणार होता. पण त्याला रावणाची भूमिका ऑफर केली गेली होती त्यामुळे त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला, असेही म्हटले जात होते. मात्र आता अजय देवगणच्या प्रवक्त्याने हे वृत्त फेटाळून लावले आहे. 


अजय देवगणच्या प्रवक्त्याने हे वृत्त फेटाळून लावत म्हटले की अजय देवगणला राम किंवा रावणच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलेले नाही. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, प्रवक्ताने म्हटलं की, आदिपुरुषच्या निर्मात्यांकडून अजय देवगणला कोणत्याच भूमिकेसाठी अप्रोच केलेले नाही.


यापूर्वीही असे वृत्त आले होते अजय देवगण आदिपुरूष चित्रपटात देव शंकराची भूमिका साकारणार आहे. आदिपुरूष हा एक मेगा बजेट चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभास देव रामाची भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. तो लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे.


आदिपुरूष चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राउत करत आहे. यापूर्वी त्याने अजय देवगणच्या तान्हाजी अनसंग वॉरियर चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात काजोल आणि शरद केळकरदेखील मुख्य भूमिकेत होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will Ajay Devgn play the role of Ram or Ravana in Prabhas' Adipurush? Know the truth behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.