आई-वडील विभक्त झाल्यानंतर कपूर कुटुंबियांनी केली नाही मदत, करिनाने केला खळबळजनक खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 07:40 PM2021-06-11T19:40:00+5:302021-06-11T19:40:02+5:30

करिना आणि करिश्मा या दोघीही त्यांच्या आईकडे राहिल्या तर रणधीर आपल्या आईसोबत राहात होते.

When Kareena Kapoor said Babita raised her, Karisma with no financial support from Kapoors | आई-वडील विभक्त झाल्यानंतर कपूर कुटुंबियांनी केली नाही मदत, करिनाने केला खळबळजनक खुलासा

आई-वडील विभक्त झाल्यानंतर कपूर कुटुंबियांनी केली नाही मदत, करिनाने केला खळबळजनक खुलासा

Next
ठळक मुद्देकरिना कपूरने एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे की, आमच्या आईने आम्हाला एकटीने सांभाळले. त्याकाळात कपूर कुटुंबियांकडून आम्हाला आर्थिक मदत मिळाली नाही.

अभिनेते रणधीर कपूर आणि बबिता यांनी लग्नाच्या काहीच वर्षांनंतर वेगळे व्हायचा निर्णय घेतला. रणधीर आणि बबिता यांनी कधीही घटस्फोट घेतला नसला तरी ते अनेक वर्षांपासून वेगळे राहात आहेत. करिना आणि करिश्मा या दोघीही त्यांच्या आईकडे राहिल्या तर रणधीर आपल्या आईसोबत राहात होते. आई-वडील वेगळे झाल्यानंतर आम्हाला कपूर कुटुंबियांतील कोणीच आर्थिक मदत केली नाही असा खळबळजनक खुलासा नुकताच करिना कपूरने केला आहे.

करिना कपूरने एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे की, आमच्या आईने आम्हाला एकटीने सांभाळले. त्याकाळात कपूर कुटुंबियांकडून आम्हाला आर्थिक मदत मिळाली नाही. माझी आई काही ना काही काम करत राहायची. पैसे कमवण्यासाठी आईने रिअल इस्टेटचा व्यवसाय देखील केला होता. तिने घेतलेल्या मेहनतीमुळेच आम्हाला यश मिळाले. तेव्हा आम्ही वडिलांना खूपच कमी भेटायचो. पण आता आमच्यात सगळे काही चांगले आहे. 

रणधीर आणि बबिता यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर बबिता यांनी चित्रपटात काम करणे बंद केले. पण लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्या दोघांमध्ये सतत वाद व्हायला लागले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Kareena Kapoor said Babita raised her, Karisma with no financial support from Kapoors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app