'War' breaks Kabir Singh's record; Passed 250 crores on 11th day! | ‘वॉर’ चित्रपटाने तोडला ‘कबीर सिंग’चा रेकॉर्ड; ११व्या दिवशी पार केला २५० कोटींचा टप्पा!
‘वॉर’ चित्रपटाने तोडला ‘कबीर सिंग’चा रेकॉर्ड; ११व्या दिवशी पार केला २५० कोटींचा टप्पा!

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि गॉर्जिअस अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा सुपरहिट चित्रपट ‘कबीर सिंग’ने यंदा सगळे रेकॉर्ड तोडून नवा रेकॉर्ड सेट केला, हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण, आता आम्ही एक नवी बातमी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे, अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ या हिंदी चित्रपटाने ‘कबीर सिंग’चे सगळे रेकॉर्ड तोडले असल्याचे सुत्रांकडून कळतेय. ११ व्या दिवशीच वॉर चित्रपटाने २५० कोटींचा टप्पा पार केला आहे.

यशराज फिल्म्सचा सुपर अ‍ॅक्शन थ्रिलर ‘वॉर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटाने ११ ऑक्टोबर सात कोटी ६० लाख एवढी कमाई केली आहे. शुक्रवारी शेवटच्या आठवड्यात ‘वॉर’ची कमाई २४५ कोटी ९५ लाख रूपये एवढी कमाई केली आहे. ‘द स्काय इज पिंक’ समोर वॉर चित्रपटाचा गल्ला जास्त जमल्याचे कळतेय. कबीर सिंगची क्रेझ आता कमी झाली असून वॉरची नशा प्रेक्षकांवर चढत असल्याचे कळतेय. 

‘कबीर सिंग’ या शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच मोहिनी घातली होती. पण, आता असे वाटतेय की, ‘वॉर’ चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली आहे. हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर या त्रिकुटाच्या अभिनयाची प्रेक्षकांना आता भूरळ पडतेय असे एकंदरितच कमाईवरून दिसत आहे.      

Web Title: 'War' breaks Kabir Singh's record; Passed 250 crores on 11th day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.