ठळक मुद्देकाश्वी रेखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या हॉलिडेचे फोटो पोस्ट केल्यानंतर याच फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

कोणतीही गोष्ट करण्याचे वयाचे बंधन नसते असे म्हटले जाते आणि हीच गोष्ट बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सिद्ध केली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा वयाच्या 83 व्या वर्षी वॉटर स्नोर्कलिंग करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याच फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

वहिदा रहमान या सध्या त्यांच्या मुलीसोबत फिरायला गल्या असून त्यांच्या हॉलिडेचे फोटो त्यांच्या मुलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वहीदा यांची मुलगी काश्वी रेखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या  हॉलिडेचे फोटो पोस्ट केल्यानंतर याच फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कारण तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये वहिदा त्यांच्या मुलीसोबत वॉटर स्नोर्कलिंग करत असल्याचे दिसून येत आहे. तिने हा फोटो शेअर करताना आईसोबत स्नोर्कलिंग #waterbabies’ असे कॅप्शन लिहिले आहे. या फोटोवर वहिदा यांचे फॅन्स लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. त्यांचा पाण्याच्या आतील फोटो सध्या व्हायरल झाला आहे.


वहिदा सध्या मुलीसोबत अंदमान निकोबार येथे फिरायला गेल्या आहेत. वहिदा यांची मुलगी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती आईसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Waheeda Rehman goes snorkelling with daughter Kashvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.