ठळक मुद्देविराटने पोस्टमध्ये लिहिले आहे की, आपल्या बाळाचा जन्म होणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास अनुभव असतो. हा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला स्त्रीची खरी ताकद काय असते आणि देवाने तिच्यात एक जीव का निर्माण केला आहे हे कळते.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या घरी जानेवारीत एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. अनुष्का आणि विराटच्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे. विराटने महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली असून यासोबत अनुष्का आणि त्यांच्या मुलीचा फोटो पोस्ट केला आहे.

विराटने पोस्टमध्ये लिहिले आहे की, आपल्या बाळाचा जन्म होणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास अनुभव असतो. हा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला स्त्रीची खरी ताकद काय असते आणि देवाने तिच्यात एक जीव का निर्माण केला आहे हे कळते. महिला या पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक ताकदवान असतात. माझ्या आयुष्यातील दोन्ही महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा... तसेच जगातील सगळ्या स्त्रियांना महिला दिनाच्या शुभेच्छा.

काही दिवसांपूर्वी अनुष्काने विराट, तिचा आणि त्यांच्या बाळाचा फोटो पोस्ट केला आणि तिने लेकीचे नाव वामिका असे ठेवल्याचे जाहीर केले होते. लेकीचा सोशल मीडियावरील पहिलाच फोटो शानदार बनवण्यासाठी अनुष्काने स्पेशल कॅप्शनही लिहिले होते. तिने लिहिले होते की, ''आम्ही एकत्र प्रेम आणि कृतज्ञतेसह राहत होतो, परंतु या छोट्याशा वामिकाने आमच्या आनंदात आणखी भर टाकली. रडणे, हसणे, चिंता, आनंद या सर्व भावना आम्ही एका क्षणात अनुभवल्या. तुम्ही दाखवलेले प्रेम व प्रार्थना यासाठी आभारी आहे.''

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Virat Kohli shares Anushka Sharma, daughter Vamika’s pic on Women’s Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.