अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. हॉलिवूडमध्ये बेवॉच आणि क्वांटिको सारख्या चित्रपटात काम केल्यानंतर आता तिने आणखी एका हॉलिवूडच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. सध्या प्रियंका आगामी हॉलिवूडच्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी जर्मलीना गेली आहे. बर्लिंनच्या गल्लांमधून रपेट मारतानाचे फोटो प्रियांकाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर आता तिने गोल्फ खेळतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. 

प्रियंका चोप्रा सध्या बर्लिनमध्ये आगामी चित्रपट 'मॅट्रिक्स 4'चे शूटिंग करते आहे. यादरम्यान तिने नुकताच गोल्फ खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओतील तिचा गोल्फ खेळताना कोणत्या गोल्फ खेळाडूपेक्षा कमी वाटत नाही. प्रियंकाचा हा व्हिडीओ काही कालावधीत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते खूप रिएक्शन देताना दिसत आहेत.

प्रियांका चोप्रा मॅट्रिक्स 4 या हॉलिवूडपटात झळकणार आहे. यामध्ये प्रियांकासोबत कियानू रिव्ह्ज, कॅरी अ‍ॅनी मॉस हे कलाकार दिसणार आहेत. कोरोना व्हायरसचा फटका प्रियांकाच्या या चित्रपटाला बसला आहे. कोरोनामुळे मॅट्रिक्स 4चे शूटिंग पुढे ढकलावे लागले होते. हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. एकीकडे प्रियांका बर्लिनमध्ये मस्तपैकी फिरताना दिसत आहे तर दुसरीकडे तिचा सहकलाकार कियानू रिव्ह्जसुद्धा त्यांच्या गर्लंफ्रेंडसोबत भटकताना दिसून आला. त्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मॅट्रिक्स 4 या हॉलिवूडपटासोबतच प्रियांका काही बॉलिवूडच्या चित्रपटातही झळकणार आहे.


प्रियंका शेवटची द स्काय इज पिंक या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर, झायरा वसीम हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.


त्यानंतर आता ती द व्हाईट टायगर चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Priyanka Chopra spotted playing golf during shooting of 'Matrix 4' in Berlin, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.