Varun dhawan transfer money to in 200 bollywood dancers in bank accounts | कडक सॅल्यूट ! वरुण धवनला 200 बॅकग्राऊंड डान्सरच्या अकाऊंटमध्ये जमा केले पैसै

कडक सॅल्यूट ! वरुण धवनला 200 बॅकग्राऊंड डान्सरच्या अकाऊंटमध्ये जमा केले पैसै

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या आपल्या आगामी चित्रपटाची कुली नंबर 1मुळे चर्चेत आहे. सध्या वरुण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वरुणने कोरोना व्हायरसच्या संकटात फिल्म इंडस्ट्रमधील अनेकांना मदतीचा हात दिला. वरुण पुन्हा एकदा मदत करण्यासाठी पुढे आला आहे. वरुणने 200 बॅकग्राऊंडान्सरच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले आहेत. या गोष्टीचा खुलासा बॅकग्राऊंडान्सर राज सुराणीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्यामुळे झाला.  

डान्सर राज सुराणीने आपल्या पोस्टमध्ये याबद्दल बोलताना सांगितले की वरुणने गरजूंना मदत केली. यापैकी अनेकांना वरुणसोबत 3 डान्सबेस्ड सिनेमात काम केले आहे. या लोकांना घेऊन वरुण काळजीत होता. वरुणने त्यांना मदत करण्याचे वचन दिले होते. अनेक  बॅकग्राऊंडान्सरकडे आई- वडिलांची औषध आणण्यासाठी, घराचे भाडे देण्यासाठीदेखील पैसे नव्हते. या पोस्टमध्ये त्याने वरुण धवनचे आभार मानले आहेत. वरुणने याआधीही कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी लाखोंची मदत केली आहे. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर वरुण सारा अली खानसोबत 'कुली नंबर 1' मध्ये दिसणार आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या डेव्हिड धवनच्या ‘कुली नं.१’ चा कॉमेडी रिमेक आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच विनोदी कलाकार परेश रावल, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Varun dhawan transfer money to in 200 bollywood dancers in bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.