ठळक मुद्देबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठाशी विवाहबंधनात अडकणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. पण ही केवळ अफवा असल्याचे श्रद्धाचे म्हणणे आहे.

वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे अलिबागमध्ये नुकतेच धुमधडाक्यात लग्न झाले आणि आता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनत्री लग्नबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्रीने अनेक हिट बॉलिवूड चित्रपट दिले असून ती तिच्या प्रियकरासोबत लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठाशी विवाहबंधनात अडकणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. पण ही केवळ अफवा असल्याचे श्रद्धाचे म्हणणे आहे. सध्या मी केवळ माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असल्याचे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

एवढंच नव्हे तर श्रद्धाचे वडील अभिनेते शक्ती कपूर यांनी देखील केवळ ही एक अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, अशाप्रकारच्या अफवा कोण पसरवत आहे हेच मला कळत नाहीये. मी नेहमीच माझ्या मुलीच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठिशी उभा असतो. रोहन हा केवळ श्रद्धाचा लहानपणापासूनचा मित्र आहे. तो एक खूप चांगला मित्र आहे. पण त्या दोघांमध्ये याशिवाय कोणतेही नाते नाहीये. माझी मुलगी कोणासोबतही लग्न करेल त्यास माझा नेहमीच पाठिंबा असेन... 

वरुण आणि नताशाला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी रोहनने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर कमेंट करताना वरुणने लिहिले होते की, पुढचा नंबर तुझाच असणार आहे. यावरूनच श्रद्धा आणि रोहन लग्न करणार अशी चर्चा रंगली होती. 

रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा असून त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव बनले आहे. रोहन आणि श्रद्धा एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत असून त्यांनी 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असे म्हटले जात आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Varun Dhawan drops a major hint about Shraddha Kapoor's wedding with rumoured boyfriend Rohan Shrestha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.