Vani Kapoor infected with corona? Colorful discussion on social media | वाणी कपूरला झाली कोरोनाची लागण? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

वाणी कपूरला झाली कोरोनाची लागण? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

बॉलिवूडची बेफिक्रे गर्ल म्हणजेच अभिनेत्री वाणी कपूरने शुद्ध देसी रोमांस चित्रपटातून बॉलिवूडमधील करियरची सुरूवात केली होती. त्यानंतर ती बऱ्याच सिनेमात झळकली. तिने आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. असे म्हटले जात आहे की वाणी कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हे वृत्त सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.


वाणी कपूरला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. वाणी कपूर सध्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करते आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आयुषमान खुराणा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती चंडीगढमध्ये आगामी चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होत असल्याचे वाणी कपूरने एक पोस्ट देखील शेअर केली होती.


रिपोर्टनुसार आयुषमान आणि वाणी कपूर यांची भूमिका असलेल्या चित्रपटाची कथा उत्तर भारतातील प्रेमकथेवर आधारीत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुषमान आणि वाणी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे. याशिवाय वाणी कपूर पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत बेलबॉटम चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच त्यांनी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.


वाणी कपूरने करियरची सुरूवात छोट्या पडद्यावरून केली होती. तिने राजुूबेन या मालिकेत काम केले होते. त्यानंतर तिने यशराज बॅनरचे तीन सिनेमा साइन केले. वाणीची शुद्ध देसी रोमांस चित्रपटासाठी निवड ऑडिशनमधून झाली होती. त्यानंतर वाणी तमीळ चित्रपट आहा कलण्याममध्ये झळकली.हा चित्रपट बँड बाजा बारातचा रिमेक होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vani Kapoor infected with corona? Colorful discussion on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.