Tiger shroff reunites with director ahmed khan for baaghi 4 and heropanti 2 know here details | टायगर श्रॉफ 'बागी 4' आणि 'हिरोपंती 2'मध्ये दिसणार अ‍ॅक्शन करताना, या महिन्यात सुरु होणार सिनेमाचे शूटिंग

टायगर श्रॉफ 'बागी 4' आणि 'हिरोपंती 2'मध्ये दिसणार अ‍ॅक्शन करताना, या महिन्यात सुरु होणार सिनेमाचे शूटिंग

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा 'बागी 3' चांगलाच हिट गेला. 'बागी 3' यशानंतर 'बागी 4' ऑफिशियली घोषणा करण्यात आली आहे. फिल्म अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली. तरण आदर्श यांनी ट्विटर टायगर श्रॉफ, दिग्दर्शक अहमद खान आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटोत शेअर करताना त्यांनी लिहिले, 'बागीची टीम पुन्हा एकदा परततेय.' 'बागी'ला घेऊन  टायगर श्रॉफ, निर्माता साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक अहमद खान येत आहेत. डिसेंबरपासून सिनेमाची शूटिंग सुरु होणार आहे. यापूर्वी अहमद खानने 'बागी 2' आणि 'बाघी 3' दिग्दर्शित केले आहेत.

याशिवाय, अहमदन खान दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित 'हेरोपंती 2' चित्रपटाच्या शूटिंगला टायगर श्रॉफ डिसेंबरमध्ये सुरुवात करणार असल्याचेही तरण आदर्श यांनी सांगितले.

View this post on Instagram

Cheat day pumps are an unbelievable feeling🦍🦧

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर तो शेवटचा 'बागी 3' चित्रपटात दिसला होता. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता.याआधी 2009मध्ये आलेला 'वॉर' सिनेमा रिलीज झाला होता, जो त्याच्या करिअरमधला सगळ्यात मोठा सिनेमा ठरला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमा 300 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला होता. 'वॉर'मध्ये टागयर आणि ह्रतिक रोशनची जोडी पहिल्यांदा दिसली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tiger shroff reunites with director ahmed khan for baaghi 4 and heropanti 2 know here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.