बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर येत्या काही महिन्यांत एकामागून एक 3 सिनेमा रिलीज होणार आहेत. वाणी म्हणाली, मी बर्‍याच दिवसांपासून माझ्या आई-वडिलांना आणि बहिणीला भेटले नाही. अनेक महिन्यांपासून मी हॉटेलच्या खोलीत राहिते आहे, परंतु मला वाटते की आमच्यासाठी ही एक नवीन सामान्य गोष्ट आहे. आम्हाला आजूबाजूला बायो बबल तयार करावा लागेल जेणेकरून काम चालूच राहू शकेल. 

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारसोबत वाणीने 'बेल बॉटम'चे शूटिंग लंडनमध्ये पूर्ण केले. रणबीर कपूर स्टारर 'शमशेरा'  आणि आयुषमान खुराणासोबत 'चंडीगड करे आशिकी है' हा एक रोमँटिक सिनेमात ती दिसणार आहे. वाणी अनेक महिन्यांपासून तिच्या सामानासोबत बाहेर राहते आहे आणि येणारे काही महिने तिला शूटिंगसाठी बाहेर रहावे लागले. 


वाणी पुढे म्हणते, की मी तक्रार करत नाही कारण मी भाग्यवान आहे की मी महामारीच्या काळातही काम करते आहे. सिनेमा ही एकमेव गोष्ट आहे जी लोकांना काही तासांसाठी वेगळ्या जगात घेऊन जाऊ शकते आणि तेवढ्यावेळा ते त्यांच्या अडचणी आणि संघर्ष विसरू शकतात. सिनेमाच्या माध्यमातून ल प्रेक्षकांचे मनोरंजन होते. 


आयुषमान आणि वाणी कपूर यांची भूमिका असलेल्या चित्रपटाची कथा उत्तर भारतातील प्रेमकथेवर आधारीत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुषमान आणि वाणी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे. वाणी कपूरने करियरची सुरूवात छोट्या पडद्यावरून केली होती. तिने राजुूबेन या मालिकेत काम केले होते. त्यानंतर तिने यशराज बॅनरचे तीन सिनेमा साइन केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This thing is troubling vaani kapoor during the shoot tell her pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.