There will be no Diwali celebration at Bachchan's family home this year, this is the reason behind it | बच्चन कुटुंबाच्या घरी यंदा नाही होणार दिवाळी सेलिब्रेशन, हे आहे या मागचं कारण

बच्चन कुटुंबाच्या घरी यंदा नाही होणार दिवाळी सेलिब्रेशन, हे आहे या मागचं कारण

२०२० वर्षात अनेक वाईट बातम्या समोर आल्या. मार्च महिन्यानंतर कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सर्व काही ठप्प झाले होते. या व्हायरसमुळे लोकांना सोशल डिस्टसिंग पाळावे लागले. कोणाच्या आनंदात आणि दुःखातही सामील होता आले नाही. वर्षे सरत आले आहे आणि आता दिवाळीचा सण जवळ आला आहे. अशात सामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वच जण दिवाळी साजरी करण्यासाठी तयारी करत आहेत. मात्र यंदा अमिताभ बच्चन यांच्या घरी दिवाळी सेलिब्रेशन होणार नाही. 


खरेतर बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनने नुकतेच एका मुलाखतीत दिवाळीतील त्याच्या प्लान्सबद्दल सांगितले. यावेळी अभिषेक म्हणाला की, कुटुंबात एक निधन झाले आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे बच्चन कुटुंबानी दिवाळी पार्टी न करण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चनने सांगितले की, यावर्षी आमच्या कुटुंबात एकाचे निधन झाले आहे. माझी बहिण श्वेताची सासू (ऋतू नंदा) यांचे निधन झाले आहे. अशात कोण पार्टी होस्ट करते? जग इतक्या मोठ्या संकाटाचा सामना करत आहे. जेवढे शक्य असेल तेवढे सतर्क राहिले पाहिजे. जास्तीत जास्त सोशल डिस्टसिंग ठेवणे हा पर्याय आहे आणि हेदेखील इन्फेशनपासून वाचू याची गॅरंटीदेखील नाही. दिवाळी पार्टी आणि दुसऱ्या अशा सामाजिक प्रोग्राम खूप दूरची स्वप्न आहेत.


जुलै महिन्यात बच्चन कुटुंबात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: There will be no Diwali celebration at Bachchan's family home this year, this is the reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.