sushant singh rajput death hrithik roshan mother pinkie roshan post viral | ‘प्रत्येकाला सत्य हवंय पण...’; सुशांतच्या मृत्यूवर हृतिक रोशनच्या आईची पोस्ट

‘प्रत्येकाला सत्य हवंय पण...’; सुशांतच्या मृत्यूवर हृतिक रोशनच्या आईची पोस्ट

ठळक मुद्दे सुशांतने 14 जून 2020 रोजी कथितरित्या आत्महत्या केली होती. त्याच्या अकाली मृत्यूने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला चार महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला. सुशांतची हत्या नसून त्याने आत्महत्या केलीये, हे एम्सच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही अभिनेत्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना सीबीआय रिपोर्टची प्रतीक्षा आहे. तूर्तास सुशांतच्या मृत्यूप्रकरणावर अभिनेता हृतिक रोशन याची आई पिंकी रोशन यांनी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहेत.
 ‘प्रत्येकाला सत्य जाणून घ्यायचे आहे. पण प्रामाणिक कोणालाच बनायचे नाही,’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली. सोबतच सुशांतचा फोटोसुद्धा त्यांनी पोस्ट केला. #prayersarepowerful #universeispowerful असे हॅशटॅगसुद्धा त्यांनी या पोस्टमध्ये वापरले आहेत.

पिंकी यांच्या या पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांचा इशारा कोणाकडे आहे? कोण सत्यावर पडदा टाकतोय? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. एकीकडे त्या न्यायाबद्दल बोलत आहेत. दुसरीकडे प्रश्नही उपस्थित करत आहेत. अशास्थितीत त्यांची ही पोस्ट संभ्रम वाढवणारी आहे. बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट स्टार्सच्या यादीत हृतिक रोशनचे नाव हमखास घेतले जाते. हृतिक त्याच्या फिटनेसबद्दल प्रचंड सजग आहे. तो रोज न चुकता जिममध्ये जातो. पण हृतिकच्या कुटुंबातील एक व्यक्ती हृतिकपेक्षाही फिटनेस फ्रिक आहे. ही व्यक्ती म्हणजे, हृतिकची आई पिंकी रोशन. पिंकी रोशन एकही दिवस वर्कआऊट मिस करत नाहीत. वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, योगा असे सगळे प्रकार त्या करतात. आपल्या आईच्या या फिटनेस प्रेमामुळे हृतिकही प्रभावित आहे.

अलीकडे एका मुलाखतीत हृतिक आईबद्दल बोलला होता. माझी आई महिला शक्तीचे एक जिवंत उदाहरण आहे. तिच्या लहान मुलांसारखा उत्साह आहे. ती कायम दुसऱ्यांदा प्रभावित करत असते, असे तो म्हणाला होता.
 
सुशांतने 14 जून 2020 रोजी कथितरित्या आत्महत्या केली होती. त्याच्या अकाली मृत्यूने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीतील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले होते. बॉलिवूडमधील घराणेशाही, गटबाजी या मुद्द्यांवरून रान माजले होते. अशात सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. सध्या रिया जामिनावर सुटली आहे.

हृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई! व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!

कुठपर्यंत पोहोचला सुशांत प्रकरणाचा तपास?
सुशांतप्रकरणी सीबीआय, एनसीबी, ईडी अशा तीन तपास यंत्रणा तपास करत आहेत. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अनेकांना अटक केली आहे. मात्र सीबीआय तपासाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीबीआयने आत्तापर्यंत अनेकांची चौकशी केली.  मात्र अद्यापही सीबीआयला कुठल्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता आले नाही. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 4 महिने उलटले. पण अद्यापही सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.अशात सुशांतचे चाहते आणि त्याचे कुटुंबीय सतत न्यायाची मागणी करत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajput death hrithik roshan mother pinkie roshan post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.