Sushant promises to support ex-girlfriend Ankita even after death, video goes viral | सुशांतने एक्स गर्लफ्रेंड अंकिताला मृत्यूनंतरही साथ देण्याचे दिले होते वचन, व्हिडीओ होतोय व्हायरल

सुशांतने एक्स गर्लफ्रेंड अंकिताला मृत्यूनंतरही साथ देण्याचे दिले होते वचन, व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला जवळपास 4 महिने उलटले आहेत. तरीदेखील त्याच्या चाहत्यांना त्याने आत्महत्या केल्याचे मानत नाही आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणादरम्यान ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर एनसीबी कारवाई करत तिला अटक केली होती. तसेच तिच्या चौकशीदरम्यान बऱ्याच गोष्टी समोर आल्या.

सध्या रिया चक्रवर्तीची जामिनावर सुटका करण्यात आली पण तिच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. यादरम्यान सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सुशांत म्हणतो की मृत्यूनंतरही अंकिताची साथ कधीच सोडणार नाही. हा सीन पवित्र रिश्ता मालिकेतील मानव-अर्चना यांच्या शेवटच्या भेटीदरम्यानचा आहे. पवित्र रिश्ताच्या शेवटी दाखवले आहे की मानव अर्चमाची साथ सोडत नाही. यात तो म्हणतो की मृत्यूनंतरही तो अर्चनाची साथ कधीच सोडणार नाही.


सुशांत आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिताची भेट 2009 साली पवित्र रिश्ता मालिकेदरम्यान झाली होती. जवळपास 6 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर ते दोघे 2016 साली वेगळे झाले. 


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. तर यातील ड्रग्स कनेक्शनची चौकशी एनसीबी करत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant promises to support ex-girlfriend Ankita even after death, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.