Suhana khan funny reaction on amitabh bachchan grandson agastya nanda instagram post | अगस्त्य नंदाने शेअर केला फोटो, नव्या म्हणाली- एक्सप्लेन कर, तर सुहानाने लिहिले-अनफॉलो करेन

अगस्त्य नंदाने शेअर केला फोटो, नव्या म्हणाली- एक्सप्लेन कर, तर सुहानाने लिहिले-अनफॉलो करेन

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य आणि नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय आहेत.अलीकडेच त्याने सोशल मीडियावर काही इंटरेस्टिंग फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर तिच्या बहिण नव्या, आलिया भट आणि शाहरुख खानची लेक सुहाना खानने कमेंट्स केल्या आहेत.  अगस्त्य गेल्या वर्षी लंडनवरुन आपलं शिक्षण पूर्ण करुन आला आहे. 

अगस्तच्या पोस्टमुळे सगळे झाले कन्फ्यूज 
अगस्त्य नंदाने खूप साऱ्या फोटोंची सीरिज पोस्ट केली आहे. त्याच्या काही जवळच्या मित्रांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एका फोटोवर अगस्त्यची बहीण नव्याने लिहिले, एक्सप्लेन कर. आलियाने सुद्धा यावर कमेंट करत लिहिले, प्लीज तुझ्या अॅक्शनला एक्सप्लेन कर. 


सुहानाने लिहिले अनफॉलो करतेय
आणखी एक फोटोत अगस्त्य एकटाच बसून पोज देताना दिसतोय. यावर सुहाना खानने लिहिले, अनफॉलो करतेय. सुहाना आणि अगस्त्य खूप चांगली मैत्रई आहे. नेहमी सोशल मीडियावर ते एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. लॉकडाऊनमध्ये अगस्त्यने आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा जीममधला फोटो शेअर केला होता. गेल्या वर्षी अगस्त्यची आई श्वेता नंदाने फिल्म इंडस्ट्रीत मुलांच्या येण्याचे संकेत दिले होते

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Suhana khan funny reaction on amitabh bachchan grandson agastya nanda instagram post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.