ठळक मुद्देसंकेतने सुगंधासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत माझी सनशाईन मला मिळाली असे लिहिले आहे.

डॉ. संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा यांनी आज कॉमेडीच्या जगतात आपली ओळख निर्माण केली आहे. ते दोघे नात्यात असल्याचे संकेतने आता सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

संकेतने सुगंधासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत माझी सनशाईन मला मिळाली असे लिहिले आहे. संकेतच्या या पोस्टवर केवळ तीन तासांत 52 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. संकेतच्या या पोस्टवर पारितोष त्रिपाठी, नकुल मेहता, राहुल देव यांसारख्या सेलिब्रेटींनी कमेंट करत त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. संकेत आणि सुगंधा यांची जोडी सगळ्यात बेस्ट जोडी असल्याचे त्यांचे फॅन्स कमेंटद्वारे सांगत आहेत. 

सुगंधा मिश्राने गेल्या काही वर्षांत एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गानसमाज्ञी लता मंगेशकर यांची मिमिक्री तर ती खूपच छान करते. या मिमिक्रीसाठी तिला लता मंगेशकर यांच्याकडून देखील दाद मिळाली आहे. ती द कपिल शर्मा शो मध्ये देखील झळकली आहे. डॉ. संकेत भोसले हा प्रसिद्ध कॉमेडियन असून संजय दत्तची मिमिक्री तो खूप चांगल्याप्रकारे करतो. तो व्यवसायाने डॉक्टर आहे.

सुगंधा आणि संकेत यांची मैत्री अतिशय जुनी आहे. संकेतला द कपिल शर्मा शोमध्येदेखील सुगंधानेच आणले होते. तो या कार्यक्रमात केवळ काहीच भाग झळकला होता. त्याची मिमिक्री लोकांना खूपच आवडली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sugandha Mishra and Sanket Bhosale get engaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.