ठळक मुद्देअमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर कॅप्शन लिहिले आहे की, मिस्टर नटवरलाल मधील मेरे पास आओ हे मी गायलेले सगळ्यात पहिले गाणे... या गाण्यासाठी मी राजेश रोशन यांच्यासोबत तालीम करत होतो आणि माझ्यासोबत दोन लहान मुलं बसलेली होती. त्याच्यातील एक लहान मुलगा हृतिक रोशन.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. तसेच अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांच्या इन्स्टाग्रामवर ते अनेक जुने फोटो देखील पोस्ट करून जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. त्यांनी काही दिवसांपूवी एक जुना फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत आपल्याला एक चिमुकला मुलगा दिसत असून हा मुलगा आज मोठा सुपस्टार बनला आहे.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा फोटो मिस्टर नटरवलाल या चित्रपटातील असून हा फोटो संगीत तालमीच्या वेळेचा आहे. या चित्रपटात मेरे पास आओ हे गाणे त्यांनी गायले होते. याच गाण्याची ते तालीम करत असताना हा फोटो काढण्यात आला होता. या फोटोत आपल्याला खुर्चीवर बसलेला एक लहान मुलगा दिसत आहे. हा लहान मुलगा दुसरा कोणीही नसून आजचा सुपरस्टार हृतिक रोशन आहे. तर या फोटोत आपल्याला राजेश रोशन दिसत आहे. राजेश रोशन यांनीच या गाण्याला संगीत दिले होते. या फोटोसोबत अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर कॅप्शन लिहिले आहे की, मिस्टर नटवरलाल मधील मेरे पास आओ हे मी गायलेले सगळ्यात पहिले गाणे... या गाण्यासाठी मी राजेश रोशन यांच्यासोबत तालीम करत होतो आणि माझ्यासोबत दोन लहान मुलं बसलेली होती. त्याच्यातील एक लहान मुलगा हृतिक रोशन. 

हृतिक रोशनने कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे एक नायक म्हणून चित्रपटसृष्टीत एंट्री केली. हृतिकचा हा पहिला चित्रपट असला तरी या चित्रपटात त्याने रोहित आणि राज अशा दोन वेगवेगळ्या भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या. या पहिल्याच चित्रपटासाठी हृतिकला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हृतिक रोशनने कोई मिल गया, क्रिश, काबील, धुम, जोधा अकबर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या दिसण्यावर तर मुली फिदा आहेत. बॉलिवूडमधील हँडसम अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Spot Tiny Hrithik Roshan In Amitabh Bachchan's Throwback picture From Mr Natwarlal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.