South actress kajal aggarwal flaunt her wedding ring on instagram | अभिनेत्री काजल अग्रवालने दाखवली एंगेजमेंट रिंग, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

अभिनेत्री काजल अग्रवालने दाखवली एंगेजमेंट रिंग, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.काजल सध्या लग्नाच्या तायरीत बिझी आहे. काजल अग्रवालने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याl तिच्या हातात एंगेजमेंट रिंग दिसते आहे.  काजल 30 ऑक्टोबरला गौतम किचलूसोबत सात फेरे घेणार आहे. दोघांच्या लग्नात कुटुंब आणि काही जवळचे मित्र असतील. अलीकडेच तिचे बॅचलर पार्टीचे फोटो व्हायरल झाले होते. गौतम एक बिझनेसमॅन आहे. पेशाने इंटिरिअर डिझाईनर आहे.

काजलने लग्न करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर कन्फर्म केली होती. ‘मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की मी गौतम किचलूसोबत 30 ऑक्टोबरला लग्न करते आहे. जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थिती मुंबईत हा लग्न सोहळा पार पडणार आहे,’असे तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते.


काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून.साऊथमध्ये काजलला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: South actress kajal aggarwal flaunt her wedding ring on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.