चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म  पुण्यात झाला. वयाच्या अवघ्या 31 व्या स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला. मुलगा प्रतिकच्या जन्मानंतर 15 दिवसांनी स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना काही तासांपूर्वीच मृत्यू जवळ येत असल्याची जाणीव झाली होती. त्यांचा चेहरा पिवळा पडला होता. रक्ताच्या उलट्या होत आणि रुग्णालयात जात असताना त्या कोमामध्ये गेल्या.

मृत्यूच्या एक दिवस आधी
12 डिसेंबर 1986 तो दिवस होता बाकी नॉर्मल दिवसांप्रमाणेच होता. प्रतिकच्या रडण्याच्या आवाजाने स्मिता उठल्या आणि त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करु लागल्या. मुलाचा आवाज ऐकून पती राज बब्बर यांची झोप खराब व्हावी असे त्यांची अजिबात इच्छा नव्हती, कारण ते रात्री कामावरुन उशीरा परतले होते. मुलाला शांत करण्यासाठी स्मिता नर्सरीमध्ये गेल्या. त्या मुलाच्या भविष्याबाबत विचार करु लागल्या. त्यांनी मुलाचे आधीच नाव ठेवले होते त्या त्याला प्रतिक नावाने आवाज द्यायच्या. जेव्हा स्मिता प्रतिकला शांत करीत होत्या तेव्हा त्यांना दिसले की तो डोके आपल्या शरीराबाहेर घेत आहे. तेव्हा स्मिता यांनी आपल्या शरीराचे तापमान तपासले तेव्हा ते वाढलेले होते हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर दोन दिवस त्यांनी प्रतिकला स्वत:पासून दूर ठेवले, काही वेळानंतर राज बब्बर घरातून बाहेर गेले. घरी स्मिता आपल्या आठवणी ताज्या करत होत्या. 

अचानक स्मिता यांची तब्येत बिघडली
स्मिता यांच्या नळ्या काढल्या होत्या आणि त्यांना बरं वाटत होते. राज बब्बर कोणत्या तरी पार्टीत जाणार होते. स्मिता यांनी त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली पण त्यांनी नकार देत घरात आराम करण्यास सांगितले.

यानंतर राज बब्बर आंघोळ करुन बाहेर आले तेव्हा त्यांनी स्मिता यांचा चेहरा पिवळा पडलेला पाहिला. त्यांना रक्ताच्या उल्ट्या होत होत्या. डॉक्टरांशी संपर्क करण्यात आला. त्या मुलगा प्रतिकसाठी प्रचंड रडत्या होत्या. त्यांना प्रतिकपासून दूर जायचं नव्हते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्या कोमात गेल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितलं त्यांच्या मेंदूने काम करणं बंद केले आहे. दुसऱ्या दिवशी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला होता.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Smita patil birth anniversary cried for her son prateek before death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.