बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आता लवकरच नागीणच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या आगामी चित्रपटात श्रद्धा नागिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रद्धाने तिच्या नागिणीच्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटो ती नागिणीच्या लूकमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करत तिने सांगितले की हे पोस्टर्स तिच्या चाहत्यांकडून तयार केले गेलेले आहेत. तिला खूप आवडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, श्रद्धा नागिणीची भूमिका साकारणार आहे. आता तिने नव्या लूकमधील फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

श्रद्धाच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही. दिग्दर्शक विशाल फुरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. निखिल द्विवेदी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा आगामी प्रोजेक्ट तीने सिनेमांची सीरिज असणार आहे.

श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती इच्छाधारी नागीण साकारताना दिसणार आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्यानंतर ती स्त्री, स्ट्रीट डान्सर थ्रीडी, बागी ३ चित्रपटात काम करताना दिसली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shraddha Kapoor shared Herpes Look, the photos are going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.