बॉलिवूडचा हॅण्डसम हंक अभिनेता वरूण धवन दोन गोष्टींसाठी खुप चर्चेत आहे. एक म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या लग्नामुळे तर दुसरे म्हणजे त्याच्या आगामी चित्रपटामुळे. ‘कुली नं.१’ या  १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या याच चित्रपटाचा रिमेक आहे. वरूण धवन यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून वरूणने हा आनंद इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला.

वरूण धवन हा ‘कुली नं.१’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. त्याने सातत्याने त्याचे  फोटो, पोस्टस सोशल मीडिया अकाऊं टवर शेअर केले आहेत. नुकतेच त्याने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यात तो एक पॅनकेक कापून हा आनंद साजरा करतो आहे. या फोटोला कॅप्शन त्याने ‘फनिएस्ट फिल्म’ असे कॅप्शन दिले आहे. चॉकलेट सिरप आणि केळीचे काप असलेला हा पॅनकेक तो ब्रेकफास्टमध्ये  खाणार आहे. वरूण धवनने या फोटोसोबत काही ओळी लिहिल्या आहेत. ‘शुक्रवारसाठी पॅनकेक हा एक नंबर ब्रेकफास्ट आहे. ‘कुली नं.१’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. मी आत्तापर्यंत केलेल्या सर्वांत फनी चित्रपटांपैकी एक हा चित्रपट आहे. 


१९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या डेव्हिड धवनच्या ‘कुली नं.१’ चा कॉमेडी रिमेक आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर नव्या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान हे दोन कलाकार दिसतील. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत. चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shooting of 'Coolie No.1' movie completed; Varun Dhawan Celebrates 'As' Wrap Up Day !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.