बॉलिवूड चित्रपटात किसिंग सीन असणं अगदी सामान्य गोष्ट आहे. कथेनुसार काही सेलिब्रेटींना ऑनस्क्रीन किस करण्यासाठी तयार असतात. मात्र काही कलाकारा असेही आहेत ज्यांनी ऑनस्क्रीन किसिंग सीन दिले नाहीत. या यादीत सलमान खान आणि अजय देवगण यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. मात्र चार वर्षांपूर्वी एका चित्रपटात किसिंग सीन दिल्यामुळे या यादीतून अजय देवगण बाहेर पडले. या चित्रपटाचे नाव आहे शिवाय. पहिल्यांदाच किसिंग सीन देताना अजय देवगणला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शिवाय या चित्रपटात अजय देवगणने बरेच किसिंग आणि बोल्ड सीन दिले होते. तसा हा एक्शन थ्रिलर चित्रपट होता पण या चित्रपटात अजय देवगण पहिल्यांदाच किस करताना दिसला होता. अजय देवगणने इतके वर्षे किसिंग सीन पासून दूर होता, मात्र शिवायमध्ये त्याचे किसिंग सीन पाहून कित्येक लोक हैराण झाले होते.

याबद्दल कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये कपिल शर्माने काजोलला विचारले होते की, हा सीन पाहून तिची रिएक्शन काय होती. त्यावर काजोलने दिलेले उत्तर ऐकून सर्वांना हसू कोसळले होते. 


काजोलने दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगणने काजोलला सांगितले नव्हते की त्याने शिवायमध्ये किसिंग सीन दिले आहेत. ती म्हणाली की, त्याने मला सांगितले नव्हते. माझी परवानगी घेण्याआधीच त्याने माझी माफी मागितली होती. त्याने सांगितले होते की मी केले आहे. मला माफ कर. काजोलचे हे उत्तर ऐकून कपिलने मस्करी केली होती. अजय देवगणला विचारले होते की, तो किस सीन कसा कट केला होता. काजोलकडून त्याला कॉल आला होता की त्याने स्वतःच केला.


शिवाय चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा अजय देवगणचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याने या चित्रपट बनवण्यासाठी बरेच वर्षे घेतले होते. इतकी मेहनत घेऊनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरू शकला नाही. 


अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो भुज प्राइड ऑफ इंडियामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In 'Shivay', Ajay Devgn had given a kissing scene, to which Kajol had given a reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.