ठळक मुद्देयावर्षी फेब्रुवारी महिन्यात   वयाच्या 44 व्या वर्षी शिल्पा दुस-यांदा आई झाली.

स्टाईलच्याबाबतीत शिल्पा शेट्टी कायम एक पाऊल पुढे राहते.  नवनवीन फॅशन आणि स्टाईल ट्राय करणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.  साडी असो किंवा वेस्टर्न आऊटफिट ती अगदी सहजरित्या कॅरी करते. पण याच फॅशन आणि स्टाईलमुळे अनेकदा शिल्पाला ट्रोलही व्हावे लागते. सध्या शिल्पा याच कारणासाठी ट्रोल होतेय.
अलीकडे ती शूटींगसाठी मनालीला गेली होती. तेथून एका प्रायव्हेट जेटने ती मुंबईला परतली. यावेळी विमानतळावरचे तिचे फोटो व्हायरल झालेत. मात्र या फोटोंमधील शिल्पाचे फॅशनेबल कपडे आणि विशेषत: तिचे शूज पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.


ब्लॅक कलरची रिप्ड जीन्स आणि राऊउ नेकचा ओव्हरसाईज टॉप  शिवाय वेगवेगळ्या पायात दोन वेगवेगळ्या रंगाचे शूज असा तिचा अवतार होता.  तिची ही आगळीवेगळी फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली.
शिल्पा तू उलटी जीन्स घातलीस का? एक शूज तुझा अन् एक शूज राजचा घातलास का? असे मजेदार प्रश्न नेटक-यांनी विचारले. इतकी काय घाई होती की, गडबडीत दोन वेगवेगळ्या रंगाचे शूज घातले? असा सवाल एका युजरने तिला केला.

शिल्पा शेट्टी साधारण १३ वर्षांच्या लांबलचक ब्रेकनंतर ‘हंगामा 2’ सिनेमातून पुन्हा रूपेरी पडद्यावर वापसी करत आहे. या सिनेमाच्या शूटींगसाठी शिल्पा मनालीमध्ये होती. इथे तिने शूटींगसोबतच खूप एन्जॉयही केले. यादरम्यान तिचा एक व्हिडीओ अलीकडे व्हायरल झाला होता. यात शिल्पा झाडाला लागलेले सफरचंद पाहून लहान मुलासारखी उड्या मारताना दिसली होती.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात   वयाच्या 44 व्या वर्षी शिल्पा दुस-यांदा आई झाली. 15 फेब्रुवारीला शिल्पाला मुलगी झाली. सरोगसीच्या माध्यमातून शिल्पाच्या मुलीचा जन्म झाला. शिल्पाने आपल्या मुलीचे नाव समिशा शेट्टी ठेवले आहे.  2009 मध्ये शिल्पा व राज कुंद्राचे लग्न झाले. 2012 मध्ये त्यांचा मुलगा वियानचा जन्म झाला होता.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shilpa shetty return after shooting in mismatched shoes and ripped black jean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.