Shilpa shetty open her new bastian chain restaurant | शिल्पा शेट्टीने मुंबईत उघडलं नवं आलिशान रेस्टॉरंट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

शिल्पा शेट्टीने मुंबईत उघडलं नवं आलिशान रेस्टॉरंट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

चित्रपटांमध्ये अभिनय करण्याबरोबरच बॉलिवूडमधील अनेक स्टारही त्यांच्या बिझनेसमुळे ही चर्चेत आहेत. रेस्टॉरंट आणि हॉटेलचा व्यवसाय करणारे बरेच कलाकरा आहेत. शिल्पा शेट्टीदेखील त्यापैकी एक आहे. शिल्पा शेट्टीने तिचे नवीन रेस्टॉरंट सुरु केले आहे. तिने मुंबईत आपले नवीन रेस्टॉरंट उघडले आहे. अभिनेत्रीने स्वत: ही माहिती दिली आहे.

 शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहिल्यामुळे चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांसोबत खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. शिल्पाने इन्स्टाग्रामवर आपल्या नवीन रेस्टॉरंटचे फोटो पोस्ट केले आहेत. यासोबत तिने आनंद व्यक्त केला आहे. फोटोमध्ये शिल्पा शेट्टीचे नवीन रेस्टॉरंट खूपच आलिशान दिसते आहे.

शिल्पा शेट्टीने अभिनेत्री जेनेलिया डिक्रूझ, रितेश देशमुख आणि पती राजकुंद्रा यांच्यासोबतचे रेस्टॉरंटमधले फोटोदेखील शेअर केले आहेत. रेस्टॉरंटनंतर शिल्पा लवकरच फॉर्म हाऊसदेखील खरेदी करणार आहे. शिल्पाने आतापर्यंत कर्जतमधील ७-८ फार्महाऊस बघितले आहेत. काही फार्महाऊस तिला पसंतही पडले आहेत. पतीचा होकार आला तर ती लवकरच कर्जतमध्ये फार्महाऊस खरेदी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shilpa shetty open her new bastian chain restaurant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.