आज संपूर्ण देश दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेदेखीलदिवाळीचा सण साजरा करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. तिने या तयारीचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओत ती मुलगा विआनसोबत रांगोळी काढताना दिसते आहे. शेवटी दोघे दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

शिल्पा शेट्टीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, वर्षातील सर्वात रंगीन आणि सुंदर वेळ आली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या परंपरेसोबत मी आणि विआन रांगोळी काढत आहेत. घरात देवी लक्ष्मीला बोलवण्यासाठी ही योग्य पद्धत आहे. शिल्पा शेट्टीने पुढे चाहत्यांना दिवाळी आणि धनत्रयोदिशीच्या शुभेच्छा दिल्या.


शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. बऱ्याचदा ती नवरा राज कुंद्रासोबत कित्येकदा मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी ती कारमध्ये लपून छपून वडापाव खात होती. यावेळी राज कुंद्राने तिचा व्हिडीओ काढून शेअर केला होता.


शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रन्टबाबत सांगायचे तर तिने नुकतंच हंगामा २ सिनेमाचे शूटींग पूर्ण केले. या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये बऱ्याच वर्षांनी परत येणार आहे.

त्यासोबतच शिल्पा शेट्टी 'निकम्मा' सिनेमातही दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shilpa Shetty made rangoli with her son Vian, shared the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.