Shilpa-Raj became old while waiting for the lockdown to end? Check out their 'Ha' funny photo ... !! | लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत शिल्पा-राज झाले म्हातारे? बघा त्यांचा ‘हा’ मजेदार फोटो...!!

लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत शिल्पा-राज झाले म्हातारे? बघा त्यांचा ‘हा’ मजेदार फोटो...!!

कोरोना या महामारीमुळे जगभरात सर्वत्र हाहाकार माजला आहे. भारतात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. भारतीय प्रशासन लॉकडाऊनच्या माध्यमातून रूग्णांच्या संख्येत घट आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर पडावे, असे सर्व नागरिकांना सांगण्यात आले आहे. मात्र, आता या लॉकडाऊनमुळे सामान्यांसोबतच सेलिब्रिटीही खुप त्रासले आहेत. आता हेच बघा ना, बॉलिवूडची हॉट अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी एक अत्यंत मजेदार फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. लॉकडाऊन संपण्याची वाट बघत ते चक्क म्हातारे झाले आहेत. तुम्हाला बघायचाय हा फोटो? बघून तुम्हीही हसून लोटपोट व्हाल यात काही शंका नाही.

 शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने त्याच्या टिष्ट्वटर हँडलवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत शिल्पा आणि राज हे दोघे दोन खुर्च्यांवर सोबत बसलेले आहेत. ते अत्यंत वयस्कर दिसत आहेत. त्या दोघांनी एकमेकांचा हात हातात पकडला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘ बेबी, ये लॉकडाऊन केव्हा संपेल? शिल्पा शेट्टीसोबत लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहे.’ या फोटोला बघून असे वाटते की, लॉकडाऊन संपेपर्यंत हे दोघे चक्क म्हातारे झाले आहेत. हा अत्यंत फनी फोटो पाहून तुम्ही अक्षरश: लोटपोट व्हाल, यात काही शंका नाही. 

सोशल मीडियावर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे कपल अत्यंत अ‍ॅक्टिव्ह असते. मध्यंतरी त्यांनी एक फनी व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात राज हा त्याची मोलकरीण समजून तिच्यासोबत रोमान्स करतो. त्याला शिल्पा शेट्टी रंगेहाथ पकडते. असा फनी व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला होता. या व्हिडीओला चाहत्यांचे लाखो हिट्स मिळाले होते.     

                                                                       

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shilpa-Raj became old while waiting for the lockdown to end? Check out their 'Ha' funny photo ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.