ठळक मुद्देशरदने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला त्याच्यासोबत त्याची मुलगी दिसत आहे. माझ्या मुलीची स्माईल पाहून मला एनर्जी मिळते असे शरदने या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे.

छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा, मराठी सिनेमा असो किंवा मग बॉलिवूड या सगळ्या माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने शरद केळकरने रसिकांची पसंती मिळवली आहे. आपला सहज सुंदर अभिनय आणि एकसे बढकर एक सिनेमांमुळे त्याने आपली छाप रसिकांवर पाडली आहे. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद झळकला होता. त्याने साकारलेल्या या भूमिकेने तर रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला होता. सर्वच स्थरावरून त्याच्या भूमिकेचे त्याच्या कामाचे कौतुक झाले. त्यामुळे नक्कीच ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ सिनेमा शरद केळकरसाठी एक टर्निंग पॉइंट ठरला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील शरदचा बोलबाला आहे. शरदला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून त्याचे चाहते त्याला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. तो नेहमीच त्याच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

शरदने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला त्याच्यासोबत त्याची मुलगी दिसत आहे. माझ्या मुलीची स्माईल पाहून मला एनर्जी मिळते असे शरदने या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे. शरदचा आणि त्याच्या मुलीचा फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. बाप-मुलीची जोडी खूपच क्यूट असल्याचे त्याचे चाहते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.

शरदच्या मुलीचे नाव किशा असून ती खूपच गोड आहे तर शरदच्या पत्नीचे नाव किर्ती गायकवाड आहे. किर्ती देखील एक अभिनेत्री आहे. २००५ मध्ये शरदने किर्तीशी लग्न केले. किर्ती आणि शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. याच मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. किर्तीने सात फेरे, छोटी बहू, ससूराल सिमर का या मालिकेत काम केले आहे. नच बलिए या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्येही तिला आपण पाहिले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sharad kelkar shares picture with daughter and give sweet caption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.