'Setters' commentator on marketing in education sector! | शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणावर परखड भाष्य करणारा ‘सेटर्स’!
शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणावर परखड भाष्य करणारा ‘सेटर्स’!

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आश्विनी चौधरी यांचा ‘सेटर्स’ हा चित्रपट चर्चेत आहे. उत्कृष्ट कथानक, स्टारकास्ट, दिग्दर्शन, विषय, युवापिढीशी संबंधित विषय हे या चित्रपटाच्या कथानकाचे बलस्थान आहेत. त्यामुळे ‘सेटर्स’च्या बाबतीत ‘कंटेंट इज किंग’ असे नक्कीच म्हणता येईल. 


बॉलिवूडमध्ये सध्या कंटेंटवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्याचा ट्रेंड आला आहे. आशयघन विषय, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारा, तरूणाईशी संबंधित अशा विषयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या दिग्दर्शकांकडून होताना दिसत आहे. या प्रयत्नाचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘सेटर्स’ चित्रपट. विकाश मनी सांगतात,‘मी आश्विनीकडे विषय काढला की, तो या विषयावर एखादा चित्रपट का बनवत नाहीस? मी स्टारकास्ट असे काही निवडले ज्यांनी आत्तापर्यंत एकत्र काम केले नाही, ते एकमेकांसोबत पहिल्यांदाच काम करत आहेत. त्यामुळे विषयाचे गांभीर्य त्यांनाही होतेच. चित्रपट सर्व दृष्टीने परफेक्ट करण्याकडे माझा कल होता.’

आश्विनी चौधरी म्हणाले,‘ चित्रपटाने नेहमी जबाबदार असले पाहिजे. आपला विषय पारदर्शकपणे आणि ठामपणे मांडला पाहिजे. सेटर्सचा मुख्य वर्ग हा युवापिढी हा आहे. त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. सध्या देशात शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे पैशांच्या जोरावर आपण काहीही विकत घेऊ शकतो, अशी धारणा समाजाकडून बनत चालली आहे. हे कुठेतरी थांबायला हवे, म्हणून या चित्रपटातून हा विषय मांडण्यात आला आहे. 
          लव्हली फिल्म्स प्रोडक्शन आणि एनएच स्टुडिओज निर्मित ‘सेटर्स’ चित्रपटात श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, सोनाली सेहगल, इशिता दत्ता, पवन मल्होत्रा, विजय राज, जमील खान, मनू रिशी, पंकज झा, नीरज सूद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. सलीम सुलेमान यांचे चित्रपटाला संगीत लाभलेले आहे. 

Web Title:   'Setters' commentator on marketing in education sector!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.