See Pics: See Priyanka Chopra's photos with her mother-in-law, her mother-in-law looks beautiful | See Pics : पाहा प्रियंका चोप्राचे तिच्या सासूसोबतचे फोटो, तिच्याइतकीच सासू दिसते सुंदर

See Pics : पाहा प्रियंका चोप्राचे तिच्या सासूसोबतचे फोटो, तिच्याइतकीच सासू दिसते सुंदर

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा-जोनास  हिच्यावर कोण फिदा नाही? तिच्या सौंदर्यावर चाहते तर घायाळ असतातच. पण आता आमच्याकडे तिच्या बाबतीत एक नवीनच बातमी आहे. तिच्या सौंदर्याच्या मोहातून अगदी तिची सासू देखील यातून सुटली नाही. होय, आम्ही सांगतोय कारण, प्रियांकाचे सासरे पॉल केल्विन जोनास यांनी प्रियांका आणि तिची सासू डेनिस मिलर जोनास यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावरूनच त्यांची एकमेकांसोबत किती बाँण्डिंग आहे, ते दिसून येतेय. तुम्हीही बघा....

निक जोनास आणि प्रियांका चोप्रा जोनास यांच्या लग्नापासूनच प्रियांका आणि तिच्या सासूमध्ये कमालीची बाँण्डिंग असल्याचं आपण पाहिले आहे.  मिआमी येथे सध्या प्रियांका तिच्या फॅमिलीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. काही फोटो तिने दोन दिवसांपूर्वी शेअर केले होतेच. पण नुकताच तिच्या सासऱ्यांनी शेअर केलेला फोटो अधिकच बोलका आहे. या फोटोवर अनेक लाईक्स अ‍ॅण्ड कमेंटस येत आहेत.

प्रियांकाच्या सासऱ्यांनी पोस्ट केलेल्या फोटोला असे कॅप्शन दिले आहे,‘आयुष्यात काही काही वेळेला तुम्हाला थोडं थांबावं लागतं आणि तो क्षण एन्जॉय करावा लागतो.’ असे कॅप्शन देऊन त्यांनी काही फोटो कोलाज करून इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. या फोटोवर एका फॅनने कमेंट केले,‘प्रियांका इज सो क्यूट अ‍ॅण्ड मॉम टू...’

 

Web Title:  See Pics: See Priyanka Chopra's photos with her mother-in-law, her mother-in-law looks beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.