बॉलिवूडची देसी गर्ल एखाद्या पार्टीत गेली आणि त्याची चर्चा झाली नाही, असं क्वचितच होतं. तिचा लूक आणि अंदाजाचे कोटींच्या घरात दिवाने आहेत. तिने निक  जोनाससोबत लग्न केल्यापासून ती जास्तच चर्चेत असते. आता आम्ही सांगतोय कारण, त्याला कारणही तसेच आहे. होय, अलीकडेच तिच्या दिराच्या जो जोनासच्या बर्थडे पार्टीत ती  काळया रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस घालून आलेली दिसली. त्यातही तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. या पार्टीतील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तुम्ही तिचे या अंदाजातील फोटो पाहिले का?

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चोप्राच्या मोठया दिराची बर्थडे पार्टी अलीकडेच न्यूयॉर्कमध्ये पार पडली. या पार्टीची थीम बाँड ड्रेसिंगवर आधारित होती. पार्टीत सगळयांनी बाँड ड्रेसिंग केली होती. यादरम्यान प्रियांका चोप्रा काळया रंगाच्या बाँड ड्रेसमध्ये आलेली दिसली. तिच्यासोबत  तिचा पती निक जोनास हा देखील होता. ते हातात हात देऊन दोघे आलेले दिसले. या काळया रंगाच्या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. त्या दोघांचे हे फोटोज  सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांना तिचा हा अंदाज तुफान आवडला आहे.

प्रियांकाचा दीर जो जोनास तो व्हाईट कलरच्या कोट आणि ड्रेसमध्ये दिसून आला. त्याच्यासोबत त्याची पत्नी सोफी टर्नर ही देखील होती. काही दिवसांपूर्वी सोफी आणि प्रियांका या दोघी मियामी मध्ये क्वालिटी टाइम घालवत होत्या. त्या दोघी  एकत्र शॉपिंग करतानाही दिसल्या होत्या.

Web Title: See Pics: Desi Girl Priyanka Appears in Transparent Dresses at Dir's Birthday Party; See her guess ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.