दिवंगत अभिनेत्री आणि बॉलीवूडची चांदनी असणाऱ्या श्रीदेवी यांची लेक असल्याने जान्हवीकडून साऱ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे सिनेमांव्यतिरिक्त जाहीराती आणि फोटोशूट करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच जान्हवी कपूरचे नववधूप्रमाणे नटलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खुद्द जान्हवीने तिच्या सोशल मीडिया पेजवर फोटोशूटचे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो पाहताच चाहत्यांनी कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत पसंती दिली आहे. हा नववधू रुपातील अंदाज पाहून पुन्हा जान्हवीच्या प्रेमात पडाल असेच हे फोटो आहेत. सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. जान्हवी किती स्टायलिश आहे हे तिचे इन्सटाग्राम अकाउंट पाहिल्यावर लगेचच कळते. 

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. आता नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या जान्हवीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच  सुंदर दिसत आहे. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

या फोटोवर लेंहग्यामध्ये जान्हवीचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. तिचा हा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून उलट सुलट चर्चा रंगत आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या ब्रायडल कलेक्शनसाठी हे खास फोटोशूट जान्हवीने केले आहे.याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे जान्हवीचा ह बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

 अलीकडे जान्हवीच्या घरात काम करणारे तीन लोक कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. यामुळे अख्खे कुटुंब चर्चेत आले होते. जान्हवी व खुशी यांचीही कोरोना चाचणी केली गेली होती. दोघींचीही चाचणी निगेटीव्ह आली होती.लवकरच ती रूही अफजाना, तख्त या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्येही ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: SEE: Janhvi looks breathtaking as a bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.