बी टाऊनची गॉर्जिअस अभिनेत्री सारा अली खान ही तिच्याकडे सध्या असलेल्या प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. ‘लव्ह आज कल २’ला मिळालेला प्रतिसाद पाहता ती सध्या बिझी आहे. या चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आता पुन्हा ती तिच्या बोल्ड अदांमुळे चर्चेत आलीय, तुम्ही तिचे ‘हे’ फोटो पाहाल आणि घायाळ व्हाल, यात काही शंकाच नाही.

 सारा अली खान ही अशी स्टारकिड आहे जिला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलीय. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोत तिने पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट्ससह बिकनी टॉप घातलेला आहे. तसेच ब्लॅक आणि व्हाईट श्रग तिने त्यावर घातला आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे,‘ इच्छा ही कायम स्वप्नातून जागे करते.’ या फोटोला तिने दिलेले कॅप्शन काय सांगते त्याचा तुम्हीच विचार करा. कारण, तिचा हा हॉट अंदाज तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही. 

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, ती सध्या तिच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुक आहे. अक्षयकुमार आणि धनुष यांच्यासोबत ती ‘अतरंगी रे’ या चित्रपटातून नव्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिका साकारणार आहे. ती अक्षयकुमार आणि धनुष यांच्या व्यक्तीरेखांसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.              

 

Web Title: · Sarah Ali Khan's Bold Payments ... Will Be Wounded !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.