Sanjay dutt wife maanayata dutt share a adorable picture and wrote a romantic message | दुबईमध्ये कुटुंबासोबत असा वेळ घालवतोय संजय दत्त, पत्नी मान्यता दत्तच्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मनं

दुबईमध्ये कुटुंबासोबत असा वेळ घालवतोय संजय दत्त, पत्नी मान्यता दत्तच्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मनं

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या पत्नी मान्यता दत्त आणि मुलांसोबत दुबईत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतो आहे. मान्यता दत्तने तिच्या सोशल मीडियावर संजय दत्तसोबतचा एक रोमाँटिक फोटो शेअर केला आहे. मान्यता लिहिते, ''जे आपल्या वाटेला आलं आहे त्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा असतो. आपण नेहमी एक पाय दुसऱ्या पायाच्या पुढे ठेवून चालत असतो. आयुष्यभर एकत्र चालतो.'' मान्यताची ही पोस्ट सोशल मीडियावर काही वेळातच व्हायरल झाली आहे. मान्यता आणि संजय दत्तच्या चाहत्यांना हा फोटो आवडला आहे. त्यांनी फोटोवर कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले, मी तुझ्या धैर्याच्या प्रेमात पडलो आहे.  तर बाकी काही चाहत्यांनी म्हटले, तुम्ही दोघे एक खूप सुंदर दिसत आहात. 


याआधीही मान्यताने फॅमिली फोटो शेअर करत  भावूक पोस्ट कॅप्शन लिहिले होती, मान्यताने लिहिले,  आज मी देवाचे आभार मानते, ज्याने मला इतकं सुंदर कुटुंब दिले. माझी कोणतीच तक्रार नाही आहे, कोणतीच विनंती नाही, फक्त आम्ही सगळे कायमचे असेच एकत्र राहुदेत... आमीन

लवकरच मुंबईत परतणार संजय दत्त
संजय दत्तला मुलांची आठवण येत होती म्हणून तो त्यांना भेटायला दुबईला गेला. लवकरच संजय दत्त मुंबईला परतणार आहे..30 सप्टेंबरपासून संजय दत्तची  तिसरी किमोथेरेपी सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत संजयने दुबईतला आपला मुक्काम वाढवला नाही तर येत्या 7 ते 8 दिवसांत मुंबईत परतले.

संजय दत्तचे वैवाहिक आयुष्यही राहिले वादात, मान्यता दत्त आधी इतक्या वेळा केले आहे लग्न

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanjay dutt wife maanayata dutt share a adorable picture and wrote a romantic message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.