अभिनेता संजय दत्तने आपल्या करिअरमध्ये अभिनेत्यापासून ते व्हिलेनपर्यंतच्या अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या फॅन्सने त्याच्या केवळ हिरो म्हणूनच नाही व्हिलेनच्या भूमिकेनाही पसंती दिली. ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले, ही बातमी समजताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. यानंतर संजूबाबावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या कठीण काळात संजय दत्तची पत्नी मान्यतासह संपूर्ण कुटूंब भक्कमपणे उभे राहिले. मान्यता वेळोवेळी संजय दत्तच्या तब्येची माहिती फॅन्सना देत असते. यादरम्या संजय दत्तने स्वत:चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे बघून त्याचे फॅन्स खूप खुश झाले आहेत.  

शुक्रवारी संजय दत्तने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहे. या संजय दत्त वेगवेगळ्या पोज देताना दिसतोय. फोटोंमध्ये संजूबाबाने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि चष्मा घातलेला दिसतोय. कॅप्शनमध्ये त्याना आगामी दोन सिनेमांची नाव लिहिलीत, 'अधीरा' आणि 'केजीएफ2'.संजय दत्तचे हे फोटो व्हायरल होतायेत.    

सिनेमांवर 700 कोटींपेक्षा अधिक पैसा
कॅन्सरचे निदान होण्याआधी संजयने अनेक सिनेमे साईन केले आहेत. यापैकी काही सिनेमांचे शूटींग पूर्ण झाले आहे तर काहींचे बाकी आहे. ‘केजीएफ 2’ या सिनेमात संजय दिसणार आहे. साऊथच्या सुपरडुपर हिट सिनेमाच्या या सीक्वलमध्ये संजय निगेटीव्ह रोलमध्ये आहे. चित्रपटाच्या काही भागांचे शूटींग बाकी असल्याचे कळतेय. ‘तोरबाज’ या सिनेमात अफगाणिस्तानची कथा पाहायला मिळणार आहे.

गिरीश मलिक दिग्दर्शित या सिनेमात संजू आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात संजयसोबत नरगिस फाखरी आणि राहुल देव मुख्य भूमिकेत आहेत. ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. पण संजय दत्तची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे.   ‘शमशेरा’ या यशराज बॅनरच्या सिनेमात संजू रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanjay dutt shares his photo during cancer diagnosis on instagram and say gearing up for adheera kgf chapter 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.