Sanjay dutt to return from dubai soon as his third chemotherapy cycle | दुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण

दुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण

गेल्या आठवड्यात अभिनेता संजय दत्त आपल्या मुलांना भेटण्यासाठी दुबईला गेला आहे. सध्या दुबईमध्ये आपल्या मुलांसोबत संजूबाब क्वॉलिटी टाईम स्पेंट करतो आहे. संजय सोबत त्याची पत्नी मान्यता दत्तही दुबईमध्ये आहे. लवकर संजय आणि मान्यता दुबईवरुन परतणार आहेत. 

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, संजय दत्तला 30 सप्टेंबरला मुंबईत हजर राहवाचं लागले कारण या दिवसापासून त्याची तिसरी किमोथेरेपी सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत संजयने दुबईतला आपला मुक्काम वाढवला नाही तर येत्या 7 ते 8 दिवसांत मुंबईत परतले. 

आधी अमेरिका किंवा सिंगापूरमध्ये जायचे होते संजय दत्तला
संजय दत्तचा किमोथेरपीसाठी आधी अमेरिकेत जाण्याचा प्लान होता मात्र असे होऊ शकले नाही. दुसरी पसंती सिंगापूरला होती मात्र तेही रद्द झाले. सध्या संजय दत्त मुंबईतच कॅन्सरवर उपचार घेतो आहे.

कॅन्सरचे निदान होण्यापूर्वी संजयने अनेक सिनेमे साईन केले होते.कॅन्सवर उपचार घेत असताना संजय दत्तने याचा परिणाम कामावर होऊ दिला नाही. उपचारांसोब संजय दत्तने आगामी सिनेमा शमशेराचे शूटिंग पूर्ण केले आहे. थोड्याशा पॅचवर्कसाठी त्याची गरज होती. याशिवा चित्रपटाशिवाय केजीएफ- चॅप्टर 2, पृथ्वीराज, भुज- द प्राईड ऑफ इंडिया, तोरबाज असे सिनेमे आहेत.

थकलेला चेहरा, पिचकलेले गाल कॅन्सरमध्ये अशी झालीय संजय दत्तची अवस्था, तरीही उपचार सोडून गेला दुबईला

संजय दत्तचे वैवाहिक आयुष्यही राहिले वादात, मान्यता दत्त आधी इतक्या वेळा केले आहे लग्न

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanjay dutt to return from dubai soon as his third chemotherapy cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.