आई झाल्यावर डिप्रेशनमध्ये गेली होती ही अभिनेत्री, आता जगतेय असे आयुष्य !

By गीतांजली | Published: December 14, 2020 06:45 PM2020-12-14T18:45:00+5:302020-12-14T18:45:02+5:30

'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Sameera reddy birthday special know about actress life and career | आई झाल्यावर डिप्रेशनमध्ये गेली होती ही अभिनेत्री, आता जगतेय असे आयुष्य !

आई झाल्यावर डिप्रेशनमध्ये गेली होती ही अभिनेत्री, आता जगतेय असे आयुष्य !

Next

सलमान खानचा भाऊ सोहेल खानबरोबर बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री समीरा रेड्डी गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर होती. समीराचा जन्म 14 डिसेंबर 1978 रोजी झाला होता. समीरा आज तिचा 42 वा वाढदिवस साजरा करते आहे. समीरा जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा सर्वांनी तिचा अभिनय पाहून सांगितले की ती खूप पुढे जाईल. आपल्या पहिल्याच म्युझिक व्हिडिओमुळे तिने रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. समीराच्या वाढदिवशी  जाणून घेऊया तिच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी...


समीरा रेड्डीने 1997 मध्ये गझल गायक पंकज उधास यांच्या म्युझिक व्हिडिओद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात. त्यानंतर २००२ साली 'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

समीरा बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये दिसली. 'डरना मना है', 'मुसाफिर,'नो एंट्री','प्लान',' टॅक्सी नंबर 9 2 11 'आणि' दे दना दन ' या सिनेमांमध्ये ती झळकली.  २०१२ मध्ये रिलीज झालेल्या प्रकाश झाच्या 'चक्रव्यूह'मध्ये ती शेवटीची दिसली होती.


 2014 मध्ये समीराने बिझनेसमन अक्षय वर्देसोबत विवाह केला. लग्न झाल्यावर तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. समीरा आणि अक्षय एका अ‍ॅड शूटच्या दरम्यान झाली होती. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर समीरा आणि अक्षयने लग्नाचा निर्णय घेतला. मराठमोळ्या पद्धतीने समीराचे लग्न झाले होते. 2015 साली समीराने मुलाला जन्म दिला.

समीराने सांगितले होते की, मुलाच्या जन्मानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. प्रेग्नेंन्सीनंतर समीराला प्लेसेंटा प्रिव्हिया झाला, ज्यामुळे ती सुमारे 4 ते 5 महिने तिला बेडरेस्ट होता. तिचे वजन वाढले होते ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली गेली. 2019 मध्ये तिने मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर समीरा अनेकदा आपला आई होण्याचा अनुभव शेअर करते. सिनेमांपासून दूर असलेली समीरा सध्या आपल्या मुलांच्या संगोपनामध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sameera reddy birthday special know about actress life and career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app