बिईंग ह्युमन म्हणत बॉलिवूडच्या दबंग खान सलमानने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेच आहे. तो कायम चाहत्यांच्या आनंदाचा विचार करतो. त्यामुळे त्याची फॅन फॉलोईंगही चांगली आहे. सलमान रमजान ईदला त्याचा एकतरी चित्रपट रिलीज करतोच. मात्र, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तो त्याचा चित्रपट रिलीज करू शकत नाहीये. यामुळे चाहत्यांना नाराज व्हायची गरज नाही. कारण तो उद्या म्हणजेच रमजान ईदनिमित्त त्याचे तिसरे गाणे लाँच करणार आहे. हे गाणे म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असणार, यात काही शंका नाही.

कोरोनामुळे निर्माण झालेले लॉकडाऊन सर्वांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आले आहे. स्वत:मधील टॅलेंटला खतपाणी घालण्यासाठी बराच वेळ सध्या मिळतोय.  कुणी वाचन, कुणी गार्डनिंग तर कुणी कुकिंग शिकून घेताना दिसत आहेत. मात्र, आपल्या भाईजानने त्याच्यातील सिंगिंग आणि कम्पोजिंग क्वालिटी जोपासली आहे. त्याने एक गाणे कम्पोज करून गायले आहे. ते उद्या तो त्याच्या फॅन्ससाठी घेऊन येत आहे. 

सलमान खानच्या ऑफिशियल टीमकडून कळतेय की,‘सलमान खान दरवर्षी ईदला त्याचा एक चित्रपट रिलीज करतो. त्याच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाईही मिळते. यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तो त्याचा चित्रपट रिलीज करू शकत नाहीये. म्हणून तो त्याच्या चाहत्यांना नाराज देखील करणार नाही. तो त्याने कम्पोज केलेले आणि गायलेले गाणे उद्या ईदनिमित्त फॅन्सच्या भेटीला आणणार आहे.’ 

‘प्यार कोरोना’,‘तेरे बिना’ या दोन गाण्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता त्याने हे तिसरे गाणे चाहत्यांसाठी बनवले आहे. तेरे बिना गाण्यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस दिसली होती. ते सध्या त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर कुटुंबासोबत राहत आहेत.

View this post on Instagram

@jacquelinef143 @waluschaa

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan's special gift to fans on the occasion of Ramadan; Will launch the third song !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.