ठळक मुद्दे 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट 13 मे ला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मल्टीप्लेक्स बंद करण्यात आले आहेत.

सलमान खानच्या आगामी चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरात सलमानचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाहीये. त्याचा 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट 13 मे ला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मल्टीप्लेक्स बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

सलमान खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, राधे ईदला प्रदर्शित करण्याचा आमचा विचार होता. पण कोरोनाच्या केसेसे वाढल्याने महाराष्ट्रात मल्टीप्लेक्स बंद आहेत. ही स्थिती अशीच राहिली तर हा चित्रपट पुढच्या ईदला प्रदर्शित होईल. पण लोकांनी मास्क घातले, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले तर कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी होईल आणि हा चित्रपट या ईदलाच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. 

'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सलमानने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे जाहीर केली होती. सलमानने 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्यासोबत लिहिले होते की, ईदचे कमिटमेंट होते आणि ईदलाच येणार... कारण मी एकदा कमिटमेंट केली... हा चित्रपट बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच 13 मे ला प्रदर्शित होणार आहे...

'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan says Radhe Your Most Wanted Bhai release might be pushed to next Eid.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.