Salman khan film radhe shoot kicks off on october 2 in karjat with all precautions and safet | सलमान खान या ठिकाणी करतोय 'राधे'चे शूटिंग, कोरोनापासून बचावासाठी सेटवर केली अशी जोरदार व्यवस्था

सलमान खान या ठिकाणी करतोय 'राधे'चे शूटिंग, कोरोनापासून बचावासाठी सेटवर केली अशी जोरदार व्यवस्था

भाईजान लॉकडाऊननंतर सात महिन्यांनी आगामी सिनेमा 'राधे'च्या शूटिंग सुरुवात करणार आहे. सलमान खान 2 ऑक्टोबरपासून एनडी स्टुडिओमध्ये राधेचे शूटिंग सुरु करतो आहे. 15 दिवसांच्या शूटिंगनंतर फायनल पॅचअप वर्क महबूब स्टुडिओमध्ये करण्यात येईल. या दरम्यान यावेळी कोरोना व्हायरसला लक्षात घेऊन सेटवर विशेष व्यवस्था केली जाईल.


 
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, मुंबईबाहेरील शूटिंग दरम्यान दिवसाचा प्रवास टाळण्यासाठी, प्रॉडक्शन टीमने एनडी स्टुडिओ जवळ एक हॉटेल बुक केले आहे जिथे सर्व तंत्रज्ञ राहतील. शूट दरम्यान त्यांना बाहेरच्यांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. सर्व क्रू ची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. सगळ्यांचे रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहे. लवकरच दुसरी टेस्ट करण्यात येणार आहे ज्यात कलाकार आणि कोर टीमचा समावेश असेल. 

कुणाचा गोंधळ होऊन नये म्हणून क्रू ला एक व्हिडीओ करुन सेटवर फॉलो करायच्या प्रोटोकॉलची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, सेटवर डॉक्टरांच्या टीमबरोबर सलमान खानची स्वतःची वैयक्तिक टीमही हजर असेल. सोहेल खान म्हणाले की, सेटवर डॉक्टरांच्या सोबत हेल्थ आणि सेफ्टी ऑफिसर्स सुद्धा असणार आहेत. गाईडलाईन्स नुसार, टीमला वापरलेले पीपीए किट आणि मास्क फेकून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा प्रभुदेवा दिग्दर्शित करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman khan film radhe shoot kicks off on october 2 in karjat with all precautions and safet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.