Saif ali khan reacts on the rumours of distancing himself from sara ali khan after ncb questioning in drug chat case | ड्रग्स प्रकरणात सारा अली खानचे नाव येताच वडिलांनी केलं होत तिला दूर? सैफ अली खानने दिलं हे स्पष्टीकरण

ड्रग्स प्रकरणात सारा अली खानचे नाव येताच वडिलांनी केलं होत तिला दूर? सैफ अली खानने दिलं हे स्पष्टीकरण

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील काही सेलेब्सची चौकशी झाली. यात अभिनेत्री सारा अली खानचे नाव देखील सामिल होते. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड सारा अली खानला एनसीबीने समन्स बजावल्यानंतर ती गोव्याहुन मुंबईत आली. सारावर ड्रग्स वापरल्याचे आणि खरेदी केल्याचे आरोप लागले होते. यानंतर अशी चर्चा रंगली की सारापासून दूर राहण्यासाठी सैफ अली खान, करिना कपूर आणि तैमूर दिल्लीला निघून गेले. सैफने साराचे ड्रग्स प्रकरणात नाव येताच पूर्वपत्नी अमृता सिंगला ही चांगलेच फटकारले होते. अशा अनेक चर्चा रंगाल्या होत्या. यावर आता सैफ अली खानची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

सैफचे तीनही मुलांवर जीवापाड प्रेम
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सैफने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, त्याच त्याच्या तीनही मुलांवर जीवापाड प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी तो नेहमी हजर आहे. पण सैफने आपल्या दोन मोठ्या मुलांपेक्षा जास्त वेळ तैमूरसोबत घालवताना दिसतो. त्याने सांगितले,  तो आपला मोठा मुलगा इब्राहिम आणि मुलगी सारा यांच्याशी सतत संपर्कात असतो आणि तिन्ही मुलांसाठी त्याच्या ह्रदयात वेगळी जागा आहे. 


सैफ अली खान, करीना कपूर आणि तैमूर सध्या दिल्लीत आहेत. करिना कपूर तिचा आगामी सिनेमा लाल सिंग चड्ढाच्या शूटिंगसाठी दिल्लीला गेली आहे. हे तिघही पतौडी पॅलेसमध्ये थांबले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Saif ali khan reacts on the rumours of distancing himself from sara ali khan after ncb questioning in drug chat case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.