बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर खान. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. १६ ऑक्टोबर, २०१२ साली सैफ आणि करीना लग्नबेडीत अडकले होते. आज त्यांच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव तैमूर आहे. जो लहानपणापासून लोकप्रिय आहे. तर करीना आणि सैफ दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लग्न सोहळ्याचा फोटो समोर आला आहे. 

डोळे दिपवणाऱ्या नवाबच्या राजेशाही लग्नाची लगबग पाहायला मिळाली. सिनेइंडस्ट्रीतील मित्र मंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न थाटामाटात पार पडले. बेगम करिना आणि नवाबी सैफ यांचा अंदाजही तितकाच खास होता. दोघेही रॉयल अंदाजात यावेळी पाहायला मिळाले होते.


या लग्नाच्या निमित्ताने सैफचा नवाबी थाट पुन्हा एकदा साऱ्यांनी अनुभवला होता. लग्नाच्या सात वर्षानंतरही दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री आजही कायम आहे. आजही जेव्हा जेव्हा दोघे एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाची नजर फक्त सैफीनावरच खिळलेल्या असतात. सोशल मीडियावर सैफीनाच्या शाही लग्न सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत.


तसेच सैफ आणि अमृता सिंग यांचे लग्न १९९१ साली झाले होते. या लग्नाला सुरुवातीला सैफच्या घरातून विरोध होता. सैफ आणि अमृता यांच्यामध्ये अमृता १२ वर्षांनी मोठी आहे. पण सैफ अमृताच्या प्रेमात आकंठ बुडाला असल्याने त्याने तिच्यासोबत लग्न केले. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा घटस्फोट २००४ मध्ये झाला आणि २०१२ मध्ये सैफने करीनासोबत लग्न केले.

सैफ आणि करीनाच्या लग्नानंतर सैफची मुले सारा आणि इब्राहिम यांचे करिनासोबत खूपच चांगले नाते आहे. त्या दोघांना अनेकवेळा सैफ आणि करिनाचा मुलगा तैमुर अली खान याच्यासोबत देखील दिसतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Saif Ali Khan and Kareena Kapoor have been married for 8 years, a photo of their royal wedding has surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.