Riteish Deshmukh son Riaan and Rahyl speaks marathi in home | रितेश देशमुखने दोन्ही मुलांना शिकवलीय मराठी भाषा, बोलतात अस्खलित मराठी, घ्या हा पुरावा

रितेश देशमुखने दोन्ही मुलांना शिकवलीय मराठी भाषा, बोलतात अस्खलित मराठी, घ्या हा पुरावा

ठळक मुद्देरितेश इन्स्टाग्रामवर नेहमीच मुलांचे व्हिडिओ शेअर करत असतो. या व्हिडिओंमध्ये रितेशची मुलं अस्खलित मराठी बोलताना दिसतात. तसेच रितेशने दसऱ्याला एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याची मुले गायत्रीमंत्र बोलताना दिसली होती.

बॉलिवूडचे स्टारकिड्सदेखील त्यांच्या पालकांप्रमाणे चर्चेत येत असतात. हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे, आर्यन खान असे स्टार कीड सध्या जोरदार चर्चेत आहेत. यासोबतच करिना कपूरचा तैमूर आणि रितेश देशमुख व जेनेलिया डिसुझा देशमुखेचे रिहान आणि राहील हे दोन्ही मुलंदेखील चर्चेत येत असतात. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा देशमुख यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांचे फोटो ते अनेकवेळा त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर करत असतात. पण त्या दोघांनाही खूपच कमी वेळा प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. मीडियाचे कॅमेरे पाहताच रिहान आणि राहिल हात जोडत सगळ्यांना नमस्कार करतात. त्यांचा हा अंदाज नेटिझन्सना खूप भावतो.

रितेश आणि जेनेलिया यांनी त्यांच्या मुलांना खूपच चांगले संस्कार दिले आहेत. रितेश हा मराठी असून जेनेलिया ही ख्रिश्चन आहे. जेनेलियाने गेल्या काही वर्षांत मराठी शिकले असून ती खूपच चांगले मराठी बोलते. त्यांच्या घरातदेखील मराठी ही भाषाच बोलली जाते. आजकाल अनेक मराठी कुटुंबातदेखील मुलांना इंग्रजी शिकवण्याकडे अधिक कल असतो. पण रितेश त्याच्या दोन्ही मुलांशी मराठीतच बोलतो. रितेश इन्स्टाग्रामवर नेहमीच मुलांचे व्हिडिओ शेअर करत असतो. या व्हिडिओंमध्ये रितेशची मुलं अस्खलित मराठी बोलताना दिसतात. तसेच रितेशने दसऱ्याला एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याची मुले गायत्रीमंत्र बोलताना दिसली होती.

रितेश आणि जेनेलियाला बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल्समध्ये गणलं जातं. लग्नानंतर जेनेलिया घर सांभाळण्यात बिझी झाली. त्यामुळे तिने चित्रपटांमध्ये काम करणे खूपच कमी केले. २००३ मध्ये आलेला 'तुझे मेरी कसम' सिनेमा रितेश आणि जेनेलियाचा पहिला सिनेमा होता. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Riteish Deshmukh son Riaan and Rahyl speaks marathi in home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.