Riteish Deshmukh Funny Video About Woke up Late in Morning | रितेश देशमुखने मांडली व्यथा, सांगतोय ही गोष्ट केली तर खाव्या लागतात चपला

रितेश देशमुखने मांडली व्यथा, सांगतोय ही गोष्ट केली तर खाव्या लागतात चपला

ठळक मुद्देरितेशने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. पर्सनल, प्रोफेशनल लाईफच्या अपडेट्ससोबतच तो आपल्या चाहत्यांसाठी फनी रिल्स शेअर करतो. त्याच्या प्रत्येक फनी रीलवर चाहते भरभरून कमेंट्स आणि लाईक्स करतात. आता रितेशने एक गमतीशीर व्हिडिओ पोस्ट केला असून या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. पण यातील एका प्रश्नाचे उत्तर ऐकून नेटिझन्सना त्यांचे हसू आवरत नाहीये. 

रितेशने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. जर तू सकाळी उशिरा उठलास तर तुला काय खायला मिळतं? असा सवाल त्याला एका चाहत्यानं केला होता. या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता त्याने चप्पल असं उत्तर दिलं. त्याच्या या उत्तरावर त्याचे चाहते मजेशीर रिप्लाय देत आहेत. रितेशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर नेहमीच फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात.  हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश आणि जेनेलिया या जोडीकडे पाहिले जाते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश आणि जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. जेनेलिया व रितेश दोघेही देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि बऱ्याचदा ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Riteish Deshmukh Funny Video About Woke up Late in Morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.